IPL Auction, Vaibhav Suryavanshi: Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात येणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. पण त्याला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले.

Manish Jadhav

IPL Auction Youngest Cricketer Vaibhav Suryavanshi: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 हंगामासाठी दोन दिवसीय मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने गर्दा केला. यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात येणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. पण त्याला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले.

दिल्लीने कात टाकली

दरम्यान, धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याचे नाव लिलावासाठी समोर आले तेव्हा त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रस्सीखेच सुरु झाली. या रस्सीखेचमध्ये वैभवची किंमत 30 लाखांवरुन वाढत वाढत 1.10 कोटीपर्यंत पोहोचली. मात्र या रस्सीखेचमध्ये दिल्लीने राजस्थानसमोर कात टाकली. राजस्थान रॉयल्सने वैभवसाठी कोट्यवधीची किंमत मोजली. आता आयपीएल 2025 च्या हंगामात वैभव संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे.

13 वर्षांचा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू होता

यंदाच्या आयपीएल लिलावाच्या लिस्टमध्ये आलेला बिहारचा वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, वैभवचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला असून त्याचे सध्याचे वय 13 वर्षे 234 दिवस (16 नोव्हेंबर 2024) एवढे आहे. वैभव बिहारकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. वैभवने यावर्षी जानेवारीत मुंबईविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

वैभवला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, वैभवचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षापासून वैभवने नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. यासाठी वैभवच्या वडिलांनी घराजवळ नेट बसवून घेतली होती. त्यानंतर वैभवने समस्तीपूरची क्रिकेट अकादमी जॉइन केली. पुढे त्याने मनीष ओझा यांच्याकडून जीसस अकादमी, पटना येथे प्रशिक्षण घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT