FC Goa Coach Manolo Márquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Super League: सातत्याच्या शोधात 'एफसी गोवा'! नॉर्थईस्टविरुद्ध करणार दोन हात; कोण मारणार बाजी?

FC Goa Vs Northeast United: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मागील लढतीत एफसी गोवाने पहिल्या विजयाची नोंद केली असली, तरी मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ पूर्ण समाधानी नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मागील लढतीत एफसी गोवाने पहिल्या विजयाची नोंद केली असली, तरी मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ पूर्ण समाधानी नाहीत. त्यांना संघाकडून सातत्याची अपेक्षा आहे.

एफसी गोवा आणि यंदाच्या मोसमात धोकादायक संघात गणल्या जाणाऱ्या नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना शुक्रवारी (ता. ४) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांचे समान चार गुण असून घरच्या मैदानावर मोसमातील पहिल्या विजयासाठी एफसी गोवा प्रयत्नशील असेल. फातोर्ड्यात त्यांना पहिल्या लढतीत जमशेदपूर एफसीने पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर कोलकत्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध बरोबरी व ईस्ट बंगालविरुद्धच्या विजयासह एफसी गोवाने स्थिती सुधारली. हुआन पेद्रो बेनाली यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेडने मागील तीन लढतीत विजय, पराभव व बरोबरी अशी कामगिरी केली आहे.

सामन्याच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पत्रकार परिषदेत मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘संघाला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. आतापर्यंत आम्ही सातत्य राखण्यात कमी पडलो आहोत. नॉर्थईस्ट युनायटेड संघ निश्चितच धोकादायक आहे. त्यांच्याकडे मोरोक्को व स्पेनमधील प्रत्येकी तीन चांगले परदेशी खेळाडू, तसेच गुणवान युवा भारतीय खेळाडू आहेत. सेट पिसेसवरील खेळात ते निष्णात आहेत. एकंदरीत आमच्यासाठी सामना कठीणच असेल.’’

किंचित दुखापतीमुळे आर्मांदो सादिकू ईस्ट बंगालविरुद्धच्या मागील लढतीत खेळला नव्हता. त्यामुळे एफसी गोवास नियमित आघाडीपटूविना मैदानात उतरावे लागले होते. सादिकू तंदुरुस्तीच्या मार्गावर असल्याची माहिती मार्केझ यांनी दिली. मागील लढतीतील हॅटट्रिकवीर बोर्हा हेर्रेरा याचेही ५६ वर्षीय मार्गदर्शकाने कौतुक केले. तो डाव्या पायाने खेळण्यात तरबेज असलेला एक दर्जेदार फुटबॉलपटू असल्याचे ते म्हणाले.

कामगिरीत सुधारणा आवश्यक

एफसी गोवाच्या यंदाच्या एकंदरीत कामगिरीविषयी मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘आम्हाला कामगिरीत सुधारणा करणे आवश्यक आहे. मागील लढतीत आम्ही काही टप्प्यात चांगले खेळलो. परिस्थितीवर चांगल्याप्रकारे नियंत्रण राखणे गरजेचे आहे. ईस्ट बंगाल संघ खचलेला होता, त्याचा लाभ आम्ही उठवला. एक मात्र खरं, की त्या विजयामुळे आमच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलले आहे. खेळाडूंत उत्साह आहे.’’

मैदानात उतरण्यापूर्वी...

एकमेकांविरुद्ध २० आयएसएल लढती, एफसी गोवाचे ६, नॉर्थईस्ट युनायटेडचे ४ विजय, १० लढती बरोबरीत

गोव्यातील १० लढतीत एफसी गोवाचे ५, तर नॉर्थईस्ट युनायटेडचा १ विजय, ४ बरोबरी

गतमोसमात फातोर्डा येथे नॉर्थईस्ट युनायटेडचा २-० फरकाने विजय, नंतर गुवाहाटी येथे १-१ गोलबरोबरी

यंदा एफसी गोवाचा बोर्हा हेर्रेरा व नॉर्थईस्ट युनायटेडचा अलाएद्दीन अजारेई यांचे प्रत्येकी ३ गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT