Ravindra Jadeja Record Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ind Vs Eng: 'सर जडेजा'च्या नावावर मोठा विक्रम! गॅरी सोबर्सना टाकले मागे; 'हा' रेकॉर्ड करणारा बनला पहिलाच खेळाडू

Ravindra Jadeja Record: भारत इंग्लंड कसोटी सामना आता रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. तिसरे सत्र संपल्यावर इंग्लंडने १ बाद पन्नास धावा अशी मजल मारलेली आहे.

Sameer Panditrao

भारत इंग्लंड कसोटी सामना आता रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. तिसरे सत्र संपल्यावर इंग्लंडने १ बाद पन्नास धावा अशी मजल मारलेली आहे. भारताला हा सामना जिंकण्यासाठी अजून नऊ विकेट्स घेण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना जडेजाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातलेली आहे. हा विक्रम करताना त्याने गॅरी सोबर्स यांच्या विक्रमालाही मागे टाकलेले आहे. या डावात जडेजाने ५३ धावांची उपयुक्त खेळी केली होती.

या मालिकेत जडेजाने एकूण ५१६ रन्स बनवलेल्या आहेत. सहाव्या अथवा त्याच्या खालील क्रमांकावर येऊन फलंदाजी करताना केल्या गेलेल्या या मालिकेतील सर्वाधिक धावा आहेत. या मालिकेत जडेजाने एक शतक, पाच अर्धशतके करून गोलंदाजीत सात विकेट्स पटकावल्या आहेत.

या मालिकेत सहावेळा पन्नासपेक्षा जास्त धाव करून जडेजाने वेस्ट इंडिजचे महान फलन्दाज गॅरी सोबर्स यांच्या नावावर असलेला विक्रम तोडून तिथे स्वतःचे नाव कोरले आहे. भारतातर्फे या यादीत असणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मणने याआधी ४७४ धावांचा विक्रम केला होता.

जडेजाने फलंदाजीत कमाल केली आहेच. हा सामना जिंकण्यासाठी तो आता गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून किती विकेट्स मिळवतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

Goa Live News: "सरकारी नोकरी मिळाल्यावर पदाचा गैरवापर करू नका"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तरुणांना कडक इशारा

VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT