IND vs ENG: यशस्वी जयस्वालचा 'डबल धमाका'! शतक झळकावून रोहित आणि गावस्करांच्या विक्रमाची केली बरोबरी

Manish Jadhav

यशस्वी जयस्वाल

इंग्लंड दौऱ्याची सुरुवात शतकाने करणाऱ्या यशस्वी जयस्वालने ओव्हल कसोटीच्या (Oval Test) शेवटच्या डावातही शतक झळकावले. त्याच्या या खेळीने भारताला मजबूत स्थितीत आणले.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक

ओव्हलमध्ये यशस्वीने केलेले हे शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक आहे. याआधी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही शतकी खेळी केली होती.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

गावस्कर-रोहितच्या पंक्तीत

या शतकामुळे यशस्वीने महान फलंदाज सुनील गावस्कर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

सर्वात जास्त शतके

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या यादीत राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर प्रत्येकी 7 शतकांसह अव्वल स्थानी आहेत. यशस्वी आता संयुक्तपणे चौथ्या स्थानी पोहोचला.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

23व्या वर्षात 9 वेळा हा पराक्रम

23 वर्षांचा असताना यशस्वीने इंग्लंडविरुद्ध 9 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने याच वयापर्यंत इंग्लंडविरुद्ध 8 वेळा हा पराक्रम केला होता.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

यशस्वीची आक्रमक शैली

या सामन्याच्या पहिल्या डावात तो केवळ 2 धावांवर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीत फलंदाजी करत धावा काढण्याची एकही संधी सोडली नाही.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

भारताची स्थिती मजबूत

यशस्वीच्या या महत्त्वपूर्ण शतकी खेळीमुळे भारतीय संघाने सामन्यात चांगली आघाडी घेतली आहे.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

भारताचा विजय

त्याची ही कामगिरी भारताच्या विजयासाठी महत्त्वाची ठरु शकते.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

Gingee Fort: ‘पूर्वेकडील ट्रॉय’! मराठ्यांचा पराक्रम आणि शौर्याची गाथा सांगणारा जिंजी किल्ला

आणखी बघा