Jasprit Bumrah Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs SA: 'जस्सी जैसा कोई नहीं!' बुमराहने 'शतक' ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज! VIDEO

Jasprit Bumrah Made History: बुमराहने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याचा अनोखा टप्पा पार केला.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Made History: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी दारुण पराभव केला. या विजयात भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसून आला आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दोन विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीमुळे बुमराहने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याचा अनोखा टप्पा पार केला. त्याच्या या 'शतकी' विक्रमामुळे चाहत्यांमध्ये 'जस्सी जैसा कोई नहीं' अशी भावना निर्माण झाली.

जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यापूर्वीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स मिळवून चमकला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 99 विकेट्स होते. कटक येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी मिळाली आणि त्याने ती साधली. बुमराहने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 हून अधिक विकेट्स मिळवल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा अर्शदीप सिंग नंतर तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.

तिन्ही फॉरमॅटमध्ये 'शतक'

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करताच जसप्रीत बुमराहने आपल्या नावावर एक अनोखा जागतिक विक्रम नोंदवला. बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला, ज्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय (तिन्ही फॉरमॅट) या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या.

घातक फलंदाजाला केले आऊट

भारताच्या (India) 101 धावांच्या मोठ्या विजयात जसप्रीत बुमराहचा वाटा खूप महत्त्वाचा होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या सध्याच्या सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या डेवाल्ड ब्रेविस याचा बळी घेतला. डावाच्या सातव्या षटकात बुमराहच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात ब्रेविसने सूर्यकुमार यादवकडे झेल दिला. ब्रेविसचा बळी घेतल्याने टीम इंडियाला सामन्यावर मजबूत पकड मिळवता आली. ब्रेविसव्यतिरिक्त बुमराहने केशव महाराजचा बळीही घेतला. टीम इंडियाच्या विजयात 'जस्सी'चा दमदार फॉर्म महत्त्वाचा ठरला. टी-20 मालिकेच्या पुढील चार सामन्यांमध्येही तो याच पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT