IPL Cricket Betting Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Illegal IPL Betting: बाणावलीत फ्लॅटमध्ये सुरू होती IPL बेटींग; पोलिसांकडून दोघांना अटक, 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

Goa Crime News: अचानक पोलिसानी धाड घातल्याने त्या दोघांची घाबरगुंडी उडाली. काही कळण्याच्या अगोदरच पोलिसांनी त्यांच्या हाती बेड्या ठोकल्या.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: वासवाडो बाणवली येथे एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेटच्या बेटिंगचा कोलवा पोलिसानी पर्दाफाश करताना दोघांच्या मुसक्या आवळल्या. इम्रान बल्लारी (२८ ) व इस्माईल बेपारी (२८ ) अशी या संशयितांची नावे असून ते दोघेही मडगावच्या नावेली भागातील आहे. त्यांच्याकडील एक लॅपटॉप, पाच मोबाईल ,व अन्य सामुग्री मिळून अंदाजे ९० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या गैरव्यवहारात अन्य काहीजण गुंतले असल्याचीही माहिती पोलिसाच्या हाती लागली आहे. ते सर्वजण आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

मंगळवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी संशयित बेटिंग घेत होते. पोलिस कारवाई होईल याचा त्यांना थांगपत्ताही लागला नव्हता. ते बेसावध होते. अचानक पोलिसानी धाड घातल्याने त्या दोघांची घाबरगुंडी उडाली. काही कळण्याच्या अगोदरच पोलिसांनी त्यांच्या हाती बेड्या ठोकल्या.

कोलवा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रितेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत व पोलिस पथकांनी ही कारवाई केली.

वासवाडो बाणावली येथे एका फ्लॅटमध्ये क्रिकेट बेटिंग चालू असल्याचा सुगावा कोलवा पोलिसांना लागला होता. पोलिस पाळत ठेवून होते. खबर पक्की निघाल्यानंतर पोलिसानी मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री त्या फ्लॅटवर धाड घालून संशयितांना रंगेहाथ पकडले.

या फ्लॅटच्या मालकाचा सध्या पोलिस शोध घेत आहेत. त्यालाही चौकशीसाठी बोलावून घेतले जाईल अशी माहिती पोलिसानी दिली. कोलवा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT