WTC Points Table 2025: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील दुसरा सामना टीम इंडियाने गमावला. दोन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने टीम इंडियाचा सूपडा साफ करत मालिका नावावर केली. या पराभवाचा टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही फटका बसला. दरम्यान, गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ अव्वल स्थानी कायम आहे. चला तर मग गुवाहाटी कसोटीनंतर झालेल्या बदलांवर एक नजर टाकूया...
नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार सामने खेळले असून चारही जिंकले आहेत. त्यांचा PCT 100 आहे. यादीत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चार सामने खेळले, ज्यातील तीन जिंकले आणि एक गमावला. संघाचा PCT सध्या 75 आहे.
त्याचवेळी, श्रीलंका गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन सामने खेळले असून एक जिंकला आणि दुसरा बरोबरीत सुटला. संघाचा PCT सध्या 66.67 आहे. त्यानंतर पाकिस्तान आहे. पाकिस्तानने (Pakistan) आतापर्यंत दोन सामने खेळले यापैकी एक जिंकला आणि एक गमावला. पाकिस्तानचा PCT 50 आहे.
या सामन्यापूर्वी टीम इंडिया (Team India) चौथ्या क्रमांकावर होती, परंतु या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला मोठा फटका बसला. गुणतालिकेत भारत पाचव्या क्रमांकावर घसरला. टीम इंडियाने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत नऊ सामने खेळले. त्यापैकी चार जिंकले आणि चार गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला. या सामन्यापूर्वी भारताचा पीसीटी 54.17 होता, तो आता 48.15 पर्यंत घसरला. मात्र टीम इंडियासाठी दिलासादायक बाब म्हणजे त्यांना तूर्तास कोणतेही कसोटी सामने खेळावे लागणार नाहीत. यामुळे पराभवाची मालिका निश्चितच थांबेल. दरम्यान, इतर संघांच्या कामगिरीनुसार टीम इंडियाचे स्थान बदलत राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.