Sporting Club Vs TRAU FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: रोनाल्डोमुळे स्पोर्टिंग गोवाची बाजी! तीन गुण केले प्राप्त; ट्राऊ एफसीवर निसटती मात

Sporting Club Vs TRAU FC: रोनाल्डो ऑलिव्हेरा याने सामन्याच्या पूर्वार्धात केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले.

Sameer Panditrao

I League Sporting Club Vs TRAU FC

पणजी: रोनाल्डो ऑलिव्हेरा याने सामन्याच्या पूर्वार्धात केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्यांनी मणिपूरमधील टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन (ट्राऊ) एफसीवर १-० फरकाने निसटती मात केली. सामना एला-जुने गोवे येथील मैदानावर झाला.

सामन्याच्या ४०व्या मिनिटास रोनाल्डोने स्पोर्टिंग गोवाला आघाडी मिळवून दिली. त्यांचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. त्यामुळे पाच लढतीनंतर सात गुण झाले असून गुणवतक्त्यात पाचवा क्रमांक मिळाला. ट्राऊ एफसीला चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले.

पाच लढतीनंतर फक्त एका गुणासह ते आठव्या क्रमांकावर कायम राहिले. स्पोर्टिंगचा पुढील सामना घरच्या मैदानावर होणार असून त्यांच्यासमोर नेरोका एफसीचे आव्हान असेल.

चानमारी एफसीचा विजयी धडाका

मिझोराममधील चामनारी एफसीने आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेतील धडाका कायम राखताना स्पोर्टस अकादमी तिरुर संघाला ३-० फरकाने हरविले. स्पर्धेतील पाचव्या विजयामुळे अपराजित असलेल्या चानमारी एफसीचे सहा सामन्यांतून १६ गुण असून ते अग्रस्थानी आहेत. तिरुर संघ १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिला. सामना ऐजॉल येथे झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT