I-League 2025: डॅनियल गोन्साल्विसचा इंज्युरी टाईममधील गोल ठरला निर्णायक; शिलाँग एफसीने धेंपो क्लबला बरोबरीत रोखले

Daniel Gonsalves Last-Minute Goal: ब्राझीलियन खेळाडू डॅनियल गोन्साल्विस याने सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये केलेल्या गोलमुळे शिलाँग लाजाँग एफसीने आय-लीग फुटबॉल सामन्यात धेंपो स्पोर्टस क्लबला ऐनवेळी २-२ असे गोलबरोबरीत रोखले.
I-League 2025
Daniel Gonsalves Last-Minute GoalDainik Gomantak
Published on
Updated on

Shillong Lajong vs Dempo SC

पणजी: ब्राझीलियन खेळाडू डॅनियल गोन्साल्विस याने सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये केलेल्या गोलमुळे शिलाँग लाजाँग एफसीने आय-लीग फुटबॉल सामन्यात धेंपो स्पोर्टस क्लबला ऐनवेळी २-२ असे गोलबरोबरीत रोखले. सामना बुधवारी (19 फेब्रुवारी) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

गोन्साल्विस याने ९०+७व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे शिलाँग लाजाँगला बरोबरीचा एक गुण मिळाला. त्यापूर्वी, गोन्साल्विस यानेच ४७व्या मिनिटास शिलाँग लाजाँगसाठी आणखी एक गोल केला होता. त्रिनिदाद-टोबॅगोचा मार्कुस जोसेफ याने सलग दुसऱ्या सामन्यात केलेल्या गोलमुळे धेंपो क्लबने ३९व्या मिनिटास आघाडी प्राप्त केली होती. नंतर ५२व्या मिनिटास महंमद अली याने केलेल्या सेट पिसेसवर केलेल्या गोलमुळे माजी विजेता संघ २-१ असा पुढे राहिला. शिलाँग लाजाँगचा गोलरक्षक रणित सरकार याची दक्षताही धेंपो क्लबच्या संभाव्य विजयाच्या आड आली.

I-League 2025
I League: धेंपो क्लबसमोर शिलाँग लाजाँगचे आव्हान! रंगतदार सामन्यात कोण बाजी मारणार?

धेंपो क्लबने पहिल्या टप्प्यात शिलाँग लाजाँगला नमविले होते, मात्र बुधवारी मेघालयातील संघाने मागील पराभवाची पुनरावृत्ती टाळली. धेंपो क्लबची ही सलग दुसरी, तर एकंदरी चौथी बरोबरी ठरली. त्यांचे आता १५ लढतीतून १९ गुण झाले असून ते नवव्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेतील पाचव्या बरोबरीमुळे शिलाँग लाजाँगने १५ सामन्यांतून २३ गुणांसह पाचवा क्रमांक राखला. धेंपो क्लबचा स्पर्धेतील पुढील सामना फातोर्डा (Fatorda) येथेच २५ फेब्रुवारी रोजी श्रीनिदी डेक्कनविरुद्ध होईल. शिलाँग लाजाँग २६ रोजी स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com