Dempo Club Vs Rajasthan United Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: धेंपो क्लबची ‘ऑल इंडिया’ पॉलिसी फेल, राजस्थानने उडवला धुव्वा; 4-0 फरकाने मोठा विजय

Dempo Club Vs Rajasthan United: पहिल्या टप्प्यात उभय संघांतील जयपूर येथे झालेला सामना १-१ गोलबरोबरीत राहिला होता.

Sameer Panditrao

I League Dempo Club Vs Rajasthan United

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत मागील लढतीत धेंपो क्लबने राबवलेली ‘ऑल इंडिया’ खेळाडूंची रणनीती यशस्वी ठरली, पण प्रभावी परदेशी खेळाडूंचा भरणा असलेल्या राजस्थान युनायटेडविरुद्ध नियोजन फोल ठरले, परिणामी माजी विजेत्यांवर शनिवारी ४-० फरकाने मोठ्या पराभवाची नामुष्की आली.

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. जेरार्ड अर्टिगस याने ४५व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे पाहुणा संघ विश्रांतीला एका गोलने आघाडीवर होता.

नंतर बदली खेळाडू लुकास रॉड्रिगेझ याने ४९व्या, पांगाम्बा नाओबा मेतेई याने ६१व्या, तर अलेन ओयार्झून याने ८७व्या मिनिटास केलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे राजस्थान युनायटेडने मोठ्या विजयाची नोंद केली. पहिल्या टप्प्यात उभय संघांतील जयपूर येथे झालेला सामना १-१ गोलबरोबरीत राहिला होता.

राजस्थान युनायटेड आता सलग सहा सामने (३ विजय, ३ बरोबरी) अपराजित आहे. त्यांनी शनिवारी पाचव्या विजयाची नोंद केली. त्यामुळे १२ लढतीतून १९ गुणांसह त्यांना पहिल्या पाच संघांत स्थान मिळाले. धेंपो क्लबला सहावा पराभव पत्करावा लागला. १२ लढतीनंतर त्यांचे १४ गुण व आठवा क्रमांक कायम राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT