I League Goa Football Matches Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League Football: धेंपो क्लब, राजस्थान सामना सुटला बरोबरीत! निर्णायक क्षणी गोलरक्षक आशिषने अडवला पेनल्टी फटका

Dempo Club Vs Rajasthan United: स्पर्धेत सलग तीन सामने गमावल्यानंतर धेंपो क्लबने गुणाची कमाई केली. एकंदरीत नऊ सामन्यांतील त्यांची ही दुसरी बरोबरी असून ११ गुण झाले आहेत.

Sameer Panditrao

I League Football Dempo Club Vs Rajasthan United

पणजी: सीरियन खेळाडू शाहेर शाहीन याचा उत्तरार्धातील गोल, तसेच गोलरक्षक आशिष सिबी याने अडवलेला पेनल्टी फटका या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत राजस्थान युनायटेडला १-१ असे गोलबरोबरीत रोखले. सामना रविवारी जयपूर येथील विद्याधर नगर स्टेडियमवर झाला.

पृथ्वेश पेडणेकर याच्या हेडिंग असिस्टवर शाहीन याने ७६व्या मिनिटास माजी विजेत्यांना गोलबरोबरीत साधून दिली. त्यापूर्वी, पूर्वार्धात ३१व्या मिनिटास गेरार्ड आर्टिगास याच्या गोलमुळे राजस्थान युनायटेडने आघाडी घेतली होती.

त्यानंतर धेंपो क्लब खेळाडूच्या हँडबॉलमुळे यजमान संघाला पेनल्टी फटका मारला. मात्र गोलरक्षक आशिष याने अचूक अंदाज बांधत अलेन ओयार्झुन याचा फटका अडविल्यामुळे राजस्थान युनायटेडला ३८व्या मिनिटास आघाडी वाढविता आली नाही.

स्पर्धेत सलग तीन सामने गमावल्यानंतर धेंपो क्लबने गुणाची कमाई केली. एकंदरीत नऊ सामन्यांतील त्यांची ही दुसरी बरोबरी असून ११ गुण झाले आहेत. गुणतक्त्यात आता नवव्या क्रमांकावर असलेल्या या संघाचा पुढील सामना २६ जानेवारी रोजी श्रीनगर येथे रियल काश्मीरविरुद्ध होईल. राजस्थान युनायटेडचे तिसऱ्या बरोबरीमुळे नऊ सामन्यांतून १२ गुण झाले असून ते सातव्या स्थानी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT