Goa Football News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: रियल काश्मीरला जोरदार धक्का, धेंपो क्लबने रोखले गोलबरोबरीत; चर्चिल ब्रदर्स, इंटर काशी लढत ठरणार निर्णायक

Dempo Club Vs Real Kashmir: महत्त्वाच्या लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबने १-१ असे गोलबरोबरीत रोखल्यामुळे रियल काश्मीरच्या आय-लीग फुटबॉल विजेतेपदाच्या आशांना जोरदार धक्का बसला.

Sameer Panditrao

पणजी: अतिशय महत्त्वाच्या लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबने १-१ असे गोलबरोबरीत रोखल्यामुळे रियल काश्मीरच्या आय-लीग फुटबॉल विजेतेपदाच्या आशांना जोरदार धक्का बसला. सामना शनिवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.

स्पर्धेच्या गुणतक्त्यात अग्रस्थानी असलेल्या चर्चिल ब्रदर्सला (३८ गुण) गाठण्यासाठी रियल काश्मीरने धेंपो क्लबला नमविणे आवश्यक होते. बरोबरीमुळे काश्मीरमधील संघाला एकच गुण मिळाला व त्यांचे २१ लढतीतून ३६ गुण झाले. त्यांचा अखेरचा साखळी सामना घरच्या मैदानावर चर्चिल ब्रदर्सविरुद्ध होणार आहे. रविवारी (ता. ३०) राय पंचायत मैदानावर चर्चिल ब्रदर्स व इंटर काशी एफसी (३५ गुण) यांच्यात होणारी लढत जेतेपदाच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते.

फातोर्डा येथे शनिवारी आयव्हरी कोस्टच्या दिदिए ब्रोसो याने ४३व्या मिनिटास धेंपो क्लबला आघाडी मिळवून दिली. ५२व्या मिनिटास कमाल इस्साह याने रियल काश्मीरसाठी बरोबरीचा गोल केला. धेंपो क्लबची ही २१ लढतीतील पाचवी बरोबरी ठरली. २६ गुणांसह ते नवव्या क्रमांकावर आहेत. धेंपो क्लबसाठी शनिवारी बचावफळीतील दक्षता लक्षवेधी ठरली.

स्पोर्टिंग गोवाने युनायटेडला नमविले

स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत युनायटेड स्पोर्टस क्लबला २-० फरकाने नमविले. बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत दोन गोल करणारा कुणाल कुंडईकर स्पोर्टिंग गोवाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पहिला गोल आठव्या, तर दुसरा गोल ३२व्या मिनिटास केला. स्पोर्टिंग क्लब द गोवाचा हा १२ सामन्यांतून सहावा विजय असून २२ गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. युनायटेड क्लबला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १३ लढतीतून १६ गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

Viral Video: पोलीस, बँड-बाजा आणि वरात! अशी अनोखी 'लव्ह मॅरेज' पाहून अख्खी वस्ती नाचली; व्हिडिओ पाहून नेटकरीही म्हणाले...

SCROLL FOR NEXT