I League: चर्चिल ब्रदर्सला पेनल्टी गोलचा फटका! श्रीनिदीसोबतचा सामना सुटला बरोबरीत; 5 गुणांची आघाडी हुकली

Churchill Brothers Vs Srinidi Deccan: डेव्हिड कास्तानेदा याने भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटास पेनल्टी फटका अचूक मारला. त्यामुळे श्रीनिदी डेक्कनला एका गुणाची कमाई करता आली.
Churchill Brothers
I League 2024-25Dainik Gomantak
Published on
Updated on

I League Churchill Brothers Vs Srinidi Deccan

पणजी: आय-लीग विजेतेपदाच्या दिशेने कूच करणाऱ्या चर्चिल ब्रदर्स संघाला भरपाई वेळेत पेनल्टी गोल स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांना दोन गुणांचा फटका बसला. राय पंचायत मैदानावर श्रीनिदी डेक्कनने ९०+११व्या मिनिटास गोल नोंदवून सामना १-१ असा बरोबरीत राखला.

डेव्हिड कास्तानेदा याने भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटास पेनल्टी फटका अचूक मारला. त्यामुळे श्रीनिदी डेक्कनला एका गुणाची कमाई करता आली. त्यापूर्वी, सेनेगलच्या पापे गास्सामा याने २९व्या मिनिटास गोल करून चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली होती.

Churchill Brothers
I League: धेंपो क्लबचा दणदणीत विजय! स्पोर्टिंग क्लब बंगळूरचा 8-1 फरकाने उडवला धुव्वा; जोसेफची हॅटट्रिक

सलग तीन सामने जिंकल्यानंतर गोव्यातील संघाला बरोबरीवर समाधान मानावे लागले. एकंदरीत त्यांची ही पाचवी बरोबरी ठरली. मागील लढतीत इंटर काशीविरुद्धही बरोबरी साधलेल्या श्रीनिदी डेक्कनची ही स्पर्धेतील सहावी बरोबरी ठरली.

Churchill Brothers
I League: स्पोर्टिंग क्लब, डायमंड हार्बर सामना सुटला बरोबरीत! दोन्ही संघांच्या खात्यात 1 गुण; 'डायमंड' अग्रस्थानी कायम

विजेतेपदाच्या शर्यतीत खूप दूर असलेल्या हैदराबाद येथील संघाचे आता २० सामन्यांतून २७ गुण झाले असून ते सहाव्या स्थानी आहेत. चर्चिल ब्रदर्सने रविवारी विजय नोंदविला असता, तर जवळचे प्रतिस्पर्धी इंटर काशी एफसी व रियल काश्मीर (प्रत्येकी ३५ गुण) यांच्यावर पाच गुणांची महत्त्वपूर्ण गुणांची आघाडी घेता आली असती. चौथ्या स्थानी असलेल्या गोकुळम केरळाचे ३४ गुण आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com