I League Dempo Club  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: धेंपो क्लबला पराभवाचा धक्का! तळाच्या दिल्ली एफसीने नोंदवला तिसरा विजय

Dempo Club Vs Delhi FC: दिल्ली एफसीने स्पर्धेतील तिसराच विजय नोंदविला. १७ सामने खेळल्यानंतर दिल्ली एफसीचे १३ गुण झाले.

Sameer Panditrao

I League Dempo Club Vs Delhi FC

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत तळाच्या दिल्ली एफसीने धेंपो स्पोर्टस क्लबला २-१ फरकाने धक्का दिला. सामना पंजाबमधील माहिलपूर येथे रविवारी झाला. धेंपो क्लबचा हा सलग दुसरा, तर एकंदरीत आठवा पराभव ठरला.

दिल्ली एफसीने स्पर्धेतील तिसराच विजय नोंदविला. १७ सामने खेळल्यानंतर दिल्ली एफसीचे १३ गुण झाले असून ते आता अकराव्या क्रमांकावर आले आहेत. धेंपो क्लबचे १९ गुण आणि नववा क्रमांक कायम राहिला.

सामन्यातील सर्व गोल पूर्वार्धातील खेळात झाले. समीर बिनाँग याने चौथ्याच मिनिटास यजमान संघाला आघाडी मिळवून दिल्यानंतर कर्णधार व्हिक्टर कामहुका याने २०व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे दिल्ली एफसीने सामन्याच्या सुरवातीलाच २-० असे वर्चस्व प्राप्त केले.

धेंपो क्लबची पिछाडी ३६व्या मिनिटास मार्कुस जोसेफ याने कमी केली. धेंपो क्लबचा स्पर्धेतील पुढील सामना आठ मार्च रोजी स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध फातोर्डा येथे खेळला जाईल.

जोरदार चुरस

स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी सध्या जोरदार चुरस आहे. रविवारी इंटर काशी एफसीला रियल काश्मीरने ३-१ असे नमविल्यामुळे रंगत वाढली आहे. आता चर्चिल ब्रदर्स व इंटर काशीचे प्रत्येकी ३१ गुण आहेत, तिसऱ्या क्रमांकावरील रियल काश्मीरचे २९ गुण झाले असून नामधारी एफसीने श्रीनिदी डेक्कनला १-० असे नमवून २६ गुणांसह चौथा क्रमांक पटकावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

कोहली म्हणाला, ''रुको, मार्कर लेके आता हूँ!'' 4 तास घराबाहेर बसलेल्या चाहत्यासाठी स्वतः धावला; किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, 'हाच खरा किंग'

SCROLL FOR NEXT