I-League 2025: चर्चिल ब्रदर्सला घरच्या मैदानावर सूर गवसला! राजस्थान युनायटेड पराभूत; ट्रिजॉय डायसचे गोल ठरले निर्णायक

Churchill Brothers Defeat Rajasthan United: मागील तीन लढतीतून फक्त दोन गुण मिळवलेल्या चर्चिल ब्रदर्सला घरच्या मैदानावर सूर गवसला. त्यांचा हा एकंदरीत नववा विजय ठरला.
I-League 2025
Churchill Brothers Defeat Rajasthan UnitedDainik Gomantak
Published on
Updated on

Churchill Brothers Defeat Rajasthan United I League Trejoy Dias Goals

पणजी: ट्रिजॉय डायस याच्या दोन गोलच्या जोरावर चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत राजस्थान युनायटेडवर 3 -1 असा सफाईदार विजय मिळवून गुणतक्त्यात 31 गुणांसह अव्वल स्थान मिळवले.

चर्चिल ब्रदर्सला घरच्या मैदानावर सूर गवसला

दरम्यान, हा सामना शनिवारी राय पंचायत मैदानावर झाला. मागील तीन लढतीतून फक्त दोन गुण मिळवलेल्या चर्चिल ब्रदर्सला (Churchill Brothers) घरच्या मैदानावर सूर गवसला. त्यांचा हा एकंदरीत नववा विजय ठरला. त्यांचे आता 17 लढतीतून 31 गुण झाले असून एक सामना कमी खेळलेल्या इंटर काशी एफसीचेही तेवढेच गुण आहेत. इंटर काशी संघ रविवारी रियल काश्मीरविरुद्ध खेळेले. राजस्थान युनायटेडला पाचवा पराभव पत्करावा लागला. 17 सामन्यांतून 24 गुणांसह ते पाचव्या क्रमांकावर कायम राहिले.

I-League 2025
I-League 2025: घरच्या मैदानावर स्पोर्टिंग गोवाचा दबदबा, नेरोका एफसीविरुद्ध नोंदवला शानदार विजय

स्टेन्डली फर्नांडिसचा विजयी गोल

ट्रिजॉय डायसने पहिला गोल 27व्या मिनिटास केला. नंतर त्यानेच दुसरा गोल 63व्या मिनिटास नोंदवला. किर्गीझस्तानचा बेक्तूर अमन्गेलदिएव याने राजस्थान युनायटेडची पिछाडी 78व्या मिनिटास कमी केली. स्टेन्डली फर्नांडिसने 84व्या मिनिटास गोल नोंदवत माजी विजेत्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com