I League 2024-25 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: चर्चिल ब्रदर्सला पुन्हा विजयाची हुलकावणी! भरपाई वेळेमुळे गोलबरोबरी; अव्वल स्थान कायम

Churchill Brothers Vs Angel FC: मिझोराममधील ऐजॉल येथील राजीव गांधी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लढतीत चर्चिल ब्रदर्सला ऐजॉल एफसीला १-१ गोलबरोबरीत रोखले.

Sameer Panditrao

I League Churchill Brothers Vs Angel FC

पणजी: ऐजॉल एफसीतर्फे आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणारा कोलंबियन खेळाडू लुईस रॉड्रिगेझ याने केलेल्या भरपाई गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला पुन्हा एकदा गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले. सलग दुसऱ्या लढतीत विजयाचे पूर्ण गुण हुकल्यामुळे गोव्यातील संघाच्या पदरी निराशाच पडली.

मिझोराममधील ऐजॉल येथील राजीव गांधी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लढतीत चर्चिल ब्रदर्सला ऐजॉल एफसीला १-१ गोलबरोबरीत रोखले. त्यामुळे उभय संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. ६०व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर दक्षिण आफ्रिकन वेड लेके याने चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली.

त्याचा हा स्पर्धेतील वैयक्तिक दहावा गोल ठरला. सामन्यातील १५ मिनिटे बाकी असताना चर्चिल ब्रदर्सचा कोलंबियन बचावपटू होजे लुईस मोरेनो याला सामन्यात दुसऱ्यांदा ताकीद देत रेफरीने रेड कार्ड दाखविले. त्यामुळे त्यांचा एक खेळाडू कमी झाला.

प्रतिस्पर्धी दहा खेळाडूंसह खेळत असल्याचा लाभ यजमान संघाने भरपाई वेळेत उठविला. ९०+६व्या मिनिटास रॉड्रिगेझ याने शानदार गोलमुळे ऐजॉल एफसीला बरोबरीचा गुण मिळाला.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात राय पंचायत मैदानावर १२ जानेवारी रोजी चर्चिल ब्रदर्सने ऐजॉल एफसीला ६-० असा धुव्वा उडविला होता, परंतु सोमवारी सामन्यावर वर्चस्व राखूनही त्यांना संधी गमावल्यामुळे विजय हुकला. चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना २४ फेब्रुवारी रोजी नामधारी एफसीविरुद्ध खेळला जाईल.

विजय हुकला

चर्चिल ब्रदर्सला सलग दुसऱ्या लढतीत तळाच्या संघाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले, त्यामुळे गुणतक्त्यात मोठी आघाडी घेण्याची त्यांची संधी हुकली. अगोदरच्या लढतीत राय येथे त्यांना दिल्ली एफसीने २-२ असे रोखले होते. चर्चिल ब्रदर्सची ही चौथी बरोबरी ठरली. त्यामुळे १५ लढतीतून २८ गुणांसह त्यांचे अव्वल स्थान कायम राहिले, मात्र दुसऱ्या क्रमांकावरील नामधारी एफसी (२५ गुण) त्यांच्यापेक्षा फक्त तीन गुणांनी मागे आहे. ऐजॉल एफसीची ही पाचवी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे १५ लढतीतून ११ गुण झाले असून अकरावा क्रमांक मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT