I League 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: अपराजित 'राजस्थान'ला भिडणार धेंपो क्लब, भारतीय खेळाडूंवर विश्वास ठेवण्याची शक्यता

Dempo Club Vs Rajasthan United: धेंपो क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांनी पुन्हा एकदा सुरवातीच्या अकरा सदस्यीय संघात सर्व भारतीय खेळाडूंची शक्यता नाकारली नाही.

Sameer Panditrao

I League Dempo Club Vs Rajasthan United

पणजी: संघातील परदेशी खेळाडू पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे धेंपो स्पोर्टस क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत दिल्ली एफसीविरुद्ध मागील लढतीत सर्व भारतीय खेळाडूंचा सुरवातीचा अकरा सदस्यीय संघ मैदानात उतरविला. आता राजस्थान युनायटेडविरुद्धही शनिवारी (ता. १) मुख्य प्रशिक्षक समीर नाईक तोच संघ कायम राखू शकतात.

धेंपो क्लब व राजस्थान युनायटेड यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी खेळला जाईल. धेंपो क्लबचे सध्या ११ लढतीतून १४ गुण असून आठव्या क्रमांकावर आहेत. राजस्थान युनायटेड सलग पाच सामने अपराजित (२ विजय, ३ बरोबरी) आहे. ११ लढतीतून १६ गुणांसह ते सातव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या टप्प्यात जयपूर येथे उभय संघांतील सामना १-१ गोलबरोबरीत राहिला होता.

पत्रकार परिषदेत धेंपो क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक यांनी पुन्हा एकदा सुरवातीच्या अकरा सदस्यीय संघात सर्व भारतीय खेळाडूंची शक्यता नाकारली नाही. ‘‘सामन्याच्या दिवशी सकाळी संघ निश्चित होईल. कदाचित मागील सामन्यातील संघच कायम राहू शकतो. खेळाडूंच्या उपलब्धतेवर सारे काही अवलंबून आहेत. आमच्या संघातील भारतीय खेळाडू छान खेळ करत असून मी त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहे,’’ असे समीर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT