Devon Conway Clean Bowled Video Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

VIDEO: हवेत उडाली स्टंप! हर्षित राणाच्या चेंडूनं कॉन्वेची दाणादाण, जल्लोष करताना गिलकडे पाहून केला 'हा' इशारा; व्हिडिओ तूफान व्हायरल

Devon Conway Clean Bowled Video: हर्षितने ज्या पद्धतीने डॅव्हन कॉन्वेची स्टंप हवेत उडवली, त्या दृश्याने स्टेडियममधील चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

Manish Jadhav

Devon Conway Clean Bowled Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात राजकोटच्या मैदानावर भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना संकटात सापडलेल्या टीम इंडियाला केएल राहुलच्या झुंजार शतकाने सावरले, तर त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या डावाला हर्षित राणाने सुरुवातीलाच सुरुंग लावला. हर्षितने ज्या पद्धतीने डॅव्हन कॉन्वेची स्टंप हवेत उडवली, त्या दृश्याने स्टेडियममधील चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या विकेटनंतर हर्षितने कर्णधार शुभमन गिलकडे केलेला इशारा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

केएल राहुलचे 'क्लास' शतक

राजकोटच्या मैदानावर नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली होती. अव्वल फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला होता. अशा स्थितीत पाचव्या क्रमांकावर आलेल्या केएल राहुलने डावाची सूत्रे हाती घेतली. राहुलने मैदानावर संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ घालत 92 चेंडूंमध्ये 112 धावांची शतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. राहुलच्या या नाबाद शतकामुळेच भारताला निर्धारित 50 षटकांत 284 धावांपर्यंत मजल मारता आली.

हर्षित राणाची 'ती' मॅजिकल डिलिव्हरी अन् जल्लोष

भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य गाठण्यासाठी डॅव्हन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स ही जोडी मैदानात उतरली. सुरुवातीच्या पाच षटकांत किवी फलंदाजांनी सावध पवित्रा घेत 22 धावा केल्या. मात्र, सहावे षटक घेऊन आलेल्या हर्षित राणाने सामन्याचे चित्र पालटले. या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर हर्षितने एक भेदक चेंडू टाकला, जो कॉन्वेला समजलाच नाही. चेंडूने थेट स्टंपचा वेध घेतला.

कॉन्वेला 'क्लीन बोल्ड' केल्यानंतर हर्षित राणाने जो जल्लोष केला, त्याने सर्वांचे लक्ष वेधले. हर्षितने धावत जाऊन कर्णधार शुभमन गिलकडे बोट दाखवून खास इशारा केला. हे पाहून असे वाटले की, या षटकापूर्वी गिल आणि राणा यांच्यात काहीतरी विशेष रणनीती ठरली होती आणि तो प्लॅन यशस्वी झाला होता.

कॉन्वेसाठी हर्षित राणा ठरतोय 'काळ'

या मालिकेत हर्षित राणाने डॅव्हन कॉन्वेला अक्षरशः सळो की पळो करुन सोडले. पहिल्या एकदिवसीय सामन्यातही हर्षितनेच कॉन्वेला बाद केले होते. आता सलग दुसऱ्या सामन्यात त्याने या दिग्गज फलंदाजाचा त्रिफळा उडवला. आकडेवारीनुसार, या मालिकेत हर्षितच्या 22 चेंडूंचा सामना करताना कॉन्वेला केवळ 18 धावा करता आल्या आणि त्याने दोनदा आपली विकेट गमावली. हर्षितची गोलंदाजी कॉन्वेसाठी 'कोडे' बनली असून आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही या दोघांमधील ही 'जंग' पाहणे रंजक ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharbandora: सफर गोव्याची! थंडीत रंगणारा धालोत्सव, मांडावर येणाऱ्या ‘रंभा; धारबांदोड्याच्या आठवणी

Iran Protest: इराणमध्ये संघर्षाचा भडका!! भारतीयांना तातडीने देश सोडण्याचे आदेश; परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली 'हाय-अलर्ट' अ‍ॅडव्हायझरी

Goa Assembly Elections 2027: गोव्यात भाजपचं 'मिशन 30'! फातोर्ड्यात सरदेसाईंना घेरण्याची तयारी; मायकल लोबोंचं सूचक विधान

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल'ला न्यायालयाचा मोठा दणका! पंचायत सचिवांनी दिलेला बांधकाम परवाना रद्द

IND vs NZ 2nd ODI: विराट कोहलीचा राजकोटमध्ये धमाका! सचिन तेंडुलकरचा मोडला 17 वर्षांचा रेकॉर्ड; न्यूझीलंडविरुद्ध बनला भारताचा 'रनमशीन' VIDEO

SCROLL FOR NEXT