Gomantak Gaud Maratha Samaj Football Tournament  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Football Tournament: गोमंतक गौड मराठा समाजातर्फे 'फुटबॉल स्पर्धा'; एकूण आठ संघांचा सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: गोमंतक गौड मराठा समाजातर्फे येत्या रविवारी २५ रोजी दुसरी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बागवाडा-गावठण खांडेपार येथील मैदानावर सकाळी आठ वाजता सुरू होणार असून संध्याकाळी पाच वाजता अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्याची माहिती प्रसाद गावकर यांनी दिली.

यावेळी समाजाचे अध्यक्ष मधू गावकर, कार्याध्यक्ष माजी आमदार प्रसाद गावकर, सल्लागार दिनेश जल्मी, सचिव शाम सांगोडकर, कोषाध्यक्ष भोला गावकर तसेच रमाकांत गावकर, रोहिदास कानसेकर, सोयरू वेळीप, पुंडलिक गावस, अमृत गावडे, उदय गावकर, शाम गावकर, नेमू मडकईकर, रामा काणकोणकर, वामन गावडे, अनंत वाडकर व समाजाचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

गावकर म्हणाले की, गेल्या वर्षी पहिल्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यंदाची ही दुसरी फुटबॉल स्पर्धा आहे.

या स्पर्धेत विजेत्या संघाला ३३ हजार ३३३ तसेच संघातील सर्व खेळाडूंना सुवर्णपदके देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला रोख २२ हजार २२२ व सर्व खेळाडूंना रौप्य पदके देण्यात येणार आहेत. उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांना ५ हजार व मानचिन्ह तसेच वैयक्तिक बक्षिसांसह प्रेक्षकांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दरम्यान, स्पर्धेत उदय गावकर यांचा काणकोण संघ, सोयरू वेळीप यांचा केपे संघ, शाम गावकर यांचा सांगे संघ, रमाकांत गावकर यांचा धारबांदोडा संघ, रोहिदास कानसेकर यांचा डिचोली संघ, पुंडलिक गावस यांचा तिसवाडी संघ, दिनेश जल्मी यांचा फोंडा संघ तर अमृत गावडे यांचा अंत्रुज संघ असे एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. स्वागत व प्रास्ताविक मधू गावकर यांनी तर सूत्रसंचालन दिनेश जल्मी यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT