I League 3 Football Tournament: सेझा अकादमीला घरच्या मैदानाचा लाभ; प्राथमिक फेरीत २५ संघांचा सहभाग

Goa Football: आय-लीग ३ स्पर्धेला चौथ्या श्रेणीचा दर्जा आहे; स्पर्धेतील सामन्यांना तीन सप्टेंबरपासून सुरवात होईल
Goa Football: आय-लीग ३ स्पर्धेला चौथ्या श्रेणीचा दर्जा आहे; स्पर्धेतील सामन्यांना तीन सप्टेंबरपासून सुरवात होईल
I League 3 Football TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आय-लीग ३ फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत गोव्याच्या सेझा फुटबॉल अकादमीस गटसाखळी सामने घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळेल. त्यांचा ब गटात समावेश असून सामने एला-जुने गोवे येथील मैदानावर होतील.

भारतीय फुटबॉल लीगमध्ये आय-लीग ३ स्पर्धेला चौथ्या श्रेणीचा दर्जा आहे. स्पर्धेतील सामन्यांना तीन सप्टेंबरपासून सुरवात होईल. प्राथमिक फेरीत एकूण २५ संघांचा सहभाग असून त्यांची पाच गटात विभागणी करण्यात आली आहे. ही फेरी एकेरी साखळी पद्धतीने खेळली जाईल. एकाच राज्यातील दोन संघ एका गटात नाहीत.

सेझा अकादमीच्या ब गटात केरळा युनायटेड, गढवाल एफसी, महाराष्ट्र ऑरेंज एफसी, दलबीर फुटबॉल अकादमी हे संघ आहेत.

Goa Football: आय-लीग ३ स्पर्धेला चौथ्या श्रेणीचा दर्जा आहे; स्पर्धेतील सामन्यांना तीन सप्टेंबरपासून सुरवात होईल
I-League Football Tournament: धेंपो स्पोर्टस क्लबचा शानदार विजय; केंकरे एफसीचा उडवला धुव्वा

आय-लीग ३ स्पर्धेतील संघांची गटवारी ः अ गट ः डायमंड हार्बर एफसी (यजमान, नैहाटी स्टेडियम कोलकाता), स्पोर्टस ओडिशा, लेक सिटी एफसी, गाझियाबाद सिटी एफसी, एसएटी तिरुर, ब गट ः सेझा फुटबॉल अकादमी (यजमान, एला-जुने गोवे मैदान), केरळा युनायटेड, गढवाल एफसी, महाराष्ट्र ऑरेंज एफसी, दलबीर फुटबॉल अकादमी, क गट ः चानमारी एफसी (यजमान, ऐजॉल), आरकेएम फुटबॉल अकादमी, एमवायजे-जीएमएससी, कोरोमांडेल एफसी, एचएएल स्पोर्टस क्लब, ड गट ः कार्बी अँगलाँग मॉर्निंग स्टार एफसी (यजमान, दिम्पू), जयपूर एलिट एफसी, क्लासा एफसी, मुंबई केंकरे एफसी, भुना एफसी, ई गट ः डाऊनटाऊन हीरोज एफसी (यजमान, श्रीनगर), कॉर्बेट एफसी, अब्बास युनियन एफसी, सदर्न स्पोर्टिंग युनियन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com