Evan Tellis wins gold in chess Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Evan Tellis: गोव्याच्या 'इव्हान'ची ऐतिहासिक सुवर्णभरारी! 7 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत अपराजित; पहिला गोमंतकीय बुद्धिबळपटू

Evan Tellis Goa Chess Gold Winner: गोव्याचा बुद्धिबळपटू इव्हान तेलिस याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना ३८व्या राष्ट्रीय सात वर्षांखालील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदकास गवसणी घातली.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू इव्हान तेलिस याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना ३८व्या राष्ट्रीय सात वर्षांखालील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदकास गवसणी घातली. ओडिशा येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने नऊ फेऱ्यांत अपराजित कामगिरी नोंदविताना आठ विजय व एका बरोबरीसह सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई केली.

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात विजेतेपद मिळविणारा इव्हान पहिला गोमंतकीय बुद्धिबळपटू ठरला आहे, त्याची कामगिरी निश्चितच गोव्यातील बुद्धिबळासाठी अभिमानास्पद आहे, असे गोवा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद म्हामल यांनी सांगितले.

ओडिशातील खोर्दा येथे झालेली स्पर्धा गुरुवारी संपली. मडगाव येथील इव्हानने विजेतेपद प्राप्त करताना जवळच्या तिघा प्रतिस्पर्ध्यांवर एका गुणाची भक्कम आघाडी घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

इव्हानचे साडेआठ गुण झाले, तर अनुक्रमे दुसरा ते चौथा क्रमांक मिळालेले पुदुचेरीचा दुवेश मिलन, महाराष्ट्राचा अंश दाधिच व कर्नाटकचा व्हिवान साहू यांचे प्रत्येकी साडेसात गुण झाले.

इव्हान (एलो १४८१) याचा स्पर्धेत बारावे मानांकन होते. स्पर्धेत सलग तीन डाव जिंकल्यानंतर त्याला चौथ्या डावात बरोबरीवर समाधान मानावे लागले. नंतर ओळीने पाच डाव जिंकून सात वर्षीय बुद्धिबळपटूने दणक्यात सुवर्णपदक पक्के केले.

या स्पर्धेतून त्याने १८८२ गुणांचे रेटिंग साधले, तसेच त्याला ६५,२ फिडे रेटिंग गुणांचाही लाभ झाला. आठव्या फेरीत त्याने स्पर्धेतील अव्वल मानांकित तेलंगणाचा श्रेयांश थुमती (एलो १५३९) याला नमवून जेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले, अखेरच्या फेरीत बिहारच्या विष्णू वैभव याल हरवून एका गुणांच्या निर्विवाद आघाडीसह अग्रस्थान राखले.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या इव्हान तेलिस याचे अभिनंदन केले आहे.

जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात

राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याने इव्हान आता आगामी ७ वर्षांखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मडगाव येथील मनोविकास स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत इव्हान याला चेस गुरु अकादमीचे प्रशिक्षक प्रकाश सिंग यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेशी नोंदणी असलेला इव्हान हा डॉ. जीन तेलिस यांचा मुलगा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT