IND vs AUS Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Chigurupati Venkat Youth ODI Debut: ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध यजमानांनी सात धावांनी विजय मिळविला, त्यात व्यंकटने एक विकेट प्राप्त केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याचा १८ वर्षीय प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज चिगुरुपती व्यंकट याने शुक्रवारी राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर भारताच्या १९ वर्षांखालील संघातून युवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध यजमानांनी सात धावांनी विजय मिळविला, त्यात व्यंकटने एक विकेट प्राप्त केली.

राजकोटमधील पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा खेळविण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८२ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ७ बाद १७५ धावांत रोखले. व्यंकट याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॅक झोस्नेक (५५ धावा) याचा महत्त्वपूर्ण बळी घेताना ३ षटकांत ३९ धावा मोजल्या. नव्या चेंडूने त्याने डावाची सुरवात केली.

भारताच्या १९ वर्षांखालील संघातून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा व्यंकट हा सौरभ बांदेकर व हेरंब परब यांच्यानंतरचा तिसरा गोमंतकीय युवा क्रिकेटपटू ठरला. विशेष बाब म्हणजे, तिघेही वेगवान गोलंदाज आहेत.

व्यंकट याने यावर्षी जुलैमध्ये कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका १९ वर्षांखालील संघाविरुद्ध भारतातर्फे युवा कसोटी (मल्टि-डे) क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने दोन्ही डावांत मिळून पाच गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत.

सेहवाग यांच्या मुलाचाही पहिला सामना

ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाविरुद्ध भारताचा महान क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग यानेही १९ वर्षांखालील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने सलामीला फलंदाजी करताना २८ धावा केल्या. या सामन्यात महान फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा यष्टिरक्षक अन्वय द्रविड (१८ चेंडूंत ३८ धावा) हा सुद्धा खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Supreme Court Verdict: नाते तुटल्यास जुने संबंध 'बलात्कार' ठरवता येणार नाहीत, लिव्ह-इन रिलेशनशिपवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Colvale Central Jail News: कैद्यांना कोर्टाचा मोठा दिलासा; कोलवाळ कारागृह अधीक्षकांना शपथ देण्याचे अधिकार

US Classified Military Info Leak: पेंटागनमध्ये खळबळ! इराण-युक्रेन युद्धाचे 'टॉप सीक्रेट' लीक; अमेरिकन जनरलची 32 वर्षांची कारकीर्द धुळीस

Dubai 24 Carat Gold Road: दुबईचा शाही थाट! चक्क 24 कॅरेट सोन्याचा रस्ता उभारणार; पर्यटकांसाठी ठरणार मोठं आकर्षण

Ranji Trophy Cricket: कमजोर फलंदाजीमुळे गोवा शरणागत, यंदा रणजी स्पर्धेत तिसरा पराभव; विदर्भ डाव व 27 धावांनी विजयी

SCROLL FOR NEXT