Goa Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: पंजाबची चिवट फलंदाजी! सामना अनिर्णित; 3 गुण कमावत गोव्याची अव्वलस्थानी झेप

Goa Vs Punjab: न्यू चंडीगड येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरील रणजी करंडक एलिट ब गट चार दिवसीय क्रिकेट सामना मंगळवारी अखेरच्या दिवशी अनिर्णित राहिला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याने पहिल्या डावात १६९ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात पंजाबची ४ बाद १०६ अशी बिकट स्थिती झाली; पण नेहाल वधेरा आणि रमणदीप सिंग यांनी चिवट फलंदाजी करत संघाचा पराभव टाळण्यात सफलता मिळवली.

न्यू चंडीगड येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरील रणजी करंडक एलिट ब गट चार दिवसीय क्रिकेट सामना मंगळवारी अखेरच्या दिवशी अनिर्णित राहिला. गोव्याला पहिल्या डावातील आघाडीचे तीन, तर पंजाबला एक गुण मिळाला.

गोव्याचे आता तीन लढतींतून एक विजय व दोन अनिर्णित या कामगिरीसह ११ गुण झाले आहेत, तर तिन्ही सामने अनिर्णित राखलेल्या पंजाबचे पाच गुण झाले आहेत. या गटात कर्नाटकचेही (कोशंट १.५९५) ११ गुण आहेत. मात्र, चांगल्या कोशंटमुळे गोवा (१.६९४) अव्वल आहे.

पहिल्या डावात शानदार १४९ धावा केलेला गोव्याचा सलामी फलंदाज सुयश प्रभुदेसाई सामन्याचा मानकरी ठरला. गोव्याचा पुढील सामना ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत पर्वरी येथे मध्य प्रदेशविरुद्ध खेळला जाईल.

गोव्याने मंगळवारी सकाळी कालच्या धावसंख्येत आणखी ५५ धावांची भर टाकताना दहा षटके फलंदाजी केरील. ६ बाद ४९४ धावसंख्येवर त्यांनी डाव घोषित केला. पंजाबच्या दुसऱ्या डावात अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन सिंग याला दीपराज गावकर याच्याकरवी झेलबाद केले.

उपाहारानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याने दोन धावांत दोन धक्के दिल्यामुळे पंजाबची ३ बाद ५९ अशी स्थिती झाली. पहिल्या डावातील शतकवीर कर्णधार उदय सहारन याने यष्टिरक्षक समर दुभाषीच्या हाती झेल दिला, तर नमन धीर पायचीत बाद झाला.

सलामीचा हरनूरसिंग पन्नू व नेहाल वधेरा यांनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. ऑफस्पिनर ललित यादव याने हरनूरच्या यष्टीचा वेध घेतल्यामुळे ही जोडी फुटली.

हरनूर याला अर्धशतकास एक धाव कमी पडली. नंतर मात्र वधेरा व रमणदीप यांनी गोव्याची गोलंदाजी सावधपणे खेळून काढताना चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची अभेद्य भागीदारी केली. नेहाल ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने १२८ चेंडूंतील खेळीत सहा चौकार व एक षटकार मारला, तर नाबाद ३६ धावा केलेल्या रमणदीपने १०३ चेंडूंत दोन चौकार व एक षटकार लगावला.

संक्षिप्त धावफलक

पंजाब, पहिला डाव : ३२५

गोवा, पहिला डाव (३ बाद ४३९ वरून) : ११७ षटकांत ६ बाद ४९४ घोषित (स्नेहल कवठणकर ७८, ललित यादव नाबाद २१, दीपराज गावकर २, दर्शन मिसाळ २, मोहित रेडकर नाबाद ६, आयुष गोयल ३-८७).

पंजाब, दुसरा डाव : ६३ षटकांत ४ बाद १७९ (हरनूरसिंग पन्नू ४९, प्रभसिमरन सिंग १७, उदय सहारन १६, नेहाल वधेरा नाबाद ५५, रमणदीप सिंग नाबाद ३६, अर्जुन तेंडुलकर ११-०-५२-१, वासुकी कौशिक ४-२-११-०, दीपराज गावकर ३-२-४-०, मोहित रेडकर १५-६-२५-०, दर्शन मिसाळ १९-२-५७-२, ललित यादव ८-३-२२-१, अभिनव तेजराणा २-०-५-०, सुयश प्रभुदेसाई १-१-०-०).

तिसऱ्या फेरीनंतर एलिट ब गट

गोवा (११ गुण)

कर्नाटक (११)

महाराष्ट्र (१०)

मध्य प्रदेश (९)

सौराष्ट्र (५)

पंजाब (५)

केरळ (२)

चंडीगड (१)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

कोहली म्हणाला, ''रुको, मार्कर लेके आता हूँ!'' 4 तास घराबाहेर बसलेल्या चाहत्यासाठी स्वतः धावला; किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, 'हाच खरा किंग'

Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

Goa Today's News Live: "परप्रांतीय मतांवर मी अवलंबून नाही, मनोज परब यांनी चूक सुधारावी": आमदार सरदेसाईंचा सल्ला

मनोज परबांपेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम, घाटी – घाटी करुनच त्यांचा आमदार निवडून आला; मेटींचा पलटवार

SCROLL FOR NEXT