World Junior Chess Champion Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

World Junior Chess Champion: वय अवघे 15 वर्षे; गोव्याच्या एथन वाझने जिंकले ज्युनियर बुद्धिबळाचे जगज्जेतेपद!

Ethan Vaz Chess World Champion: व्हेनेझुएला येथे झालेल्या फिडे जागतिक २० वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत त्याने जगज्जेतेपद पटकावताना सर्वांत युवा ज्युनियर विश्वविजेता होण्याचा मान मिळविला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: वय वर्षे अवघे १५! पण बुद्धिबळाच्या पटावर प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चीत करण्याची अफाट क्षमता आणि जगज्जेतेपदाला गवसणी घालण्याच्या जिद्दीच्या जोरावर गोव्याच्या एथन वाझ याने जागतिक बुद्धिबळात इतिहास घडविला.

व्हेनेझुएला येथे झालेल्या फिडे जागतिक २० वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत त्याने जगज्जेतेपद पटकावताना सर्वांत युवा ज्युनियर विश्वविजेता होण्याचा मान मिळविला. या देदीप्यमान यशामुळे जागतिक बुद्धिबळाच्या नकाशावर गोव्याचे नाव अभिमानाने झळकले आहे.काराकास येथे झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एथनने भारताचे प्रतिनिधित्व करताना ११ फेऱ्यांतून नऊ गुणांची कमाई केली.

भारतीय बुद्धिबळाच्या सुवर्णयादीत स्थान

ज्युनियर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात विजेतेपद मिळविणारा एथन हा पाचवा भारतीय ठरला आहे. यापूर्वी महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने १९८७ मध्ये, पेंटाला हरिकृष्ण याने २००४ मध्ये, अभिजीत गुप्ता याने २००८ मध्ये आणि प्रणव व्यंकटेश याने २०२५ मध्ये हा बहुमान मिळविला होता. आता २०२६ मध्ये एथनने या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. अवघ्या १५व्या वर्षी मिळविलेले हे यश त्याच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

आता विश्वकरंडकाचे आव्हान

ज्युनियर विश्वविजेतेपदाबरोबरच एथनने पुढील मोठ्या आव्हानासाठीही पात्रता मिळविली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत त्याला थेट संधी मिळणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आपल्या बुद्धिबळ कौशल्याची आणखी एकदा छाप पाडण्याची संधी त्याच्यासमोर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फिनिशर आता बनणार थेट कर्णधार! IPL 2027 मध्ये रिंकू सिंहच्या हाती KKR ची कमान? दिग्गजांची मोठी भविष्यवाणी

IND vs NZ: आकाश दीप OUT, प्रसिद्ध कृष्णा IN! सामन्यादरम्यान टीम इंडियात मोठा बदल; कारण काय?

Goa Sports Director Transfer: क्रीडामंत्री तवडकर आणि संचालक गावडे यांच्यातील संघर्ष विकोपाला; बदलीच्या हालचाली सुरू?

IFFI 2026 Golden Peacock Award Winner: स्पेनच्या 'आक्वी'ला सुवर्णमयूर; 'रहमा'ला गांधी पुरस्कार, 'कांतारा'चीही पुरस्कारांवर मोहोर

Afghanistan School Blast: अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील शाळेत भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू, सुमारे 100 जखमी

SCROLL FOR NEXT