Goa Struggling In CK Nayudu Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

CK Naidu Trophy: गोव्याच्या पोरांची पराभव टाळण्यासाठी धडपड! पहिल्या डावातच गुजरातनं उभारली भली मोठी धावसंख्या

Goa Struggling In CK Nayudu Trophy: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात पराभव टाळण्यासाठी गोव्याला तिसऱ्या दिवशी सोमवारी खूपच धडपड करावी लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात पराभव टाळण्यासाठी गोव्याला तिसऱ्या दिवशी सोमवारी खूपच धडपड करावी लागेल, कारण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी गुजरातने पहिल्या डावात ३८४ धावांची भली मोठी आघाडी संपादन केली.

सामना वलसाड येथील सरदार पटेल स्टेडियमवर सुरू आहे. गोव्याला (Goa) सामन्याच्या पहिल्या दिवशी १३१ धावांत गुंडाळल्यानंतर गुजरातने ५ बाद २११ धावा केल्या होत्या. रविवारी त्यांनी सर्वबाद ५१५ ही अजस्त्र धावसंख्या उभारली. नंतर दिवसअखेर गोव्याने दुसऱ्या डावात बिनबाद १० धावा केल्या.

गुजरातच्या (Gujarat) डावात रविवारी अहान पोद्दार याने शतक ठोकताना दोन शतकी भागीदारीही रचल्या. त्याने २६१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १५१ धावा केल्या. अहान याने आदित्य रावळ (८० धावा, ११४ चेंडू, ९ चौकार, १ षटकार) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी १३७ धावांची, तर एस. प्रजापती (६६ धावा, १३८ चेंडू, ६ चौकार) याच्यासह आठव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. गोव्यातर्फे ऑफस्पिनर यश कसवणकर याने १८४ धावांत ५ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः १३१ व दुसरा डाव ः ५ षटकांत बिनबाद १०.

गुजरात, पहिला डाव (५ बाद २११ वरून) ः १२९.२ षटकांत सर्वबाद ५१५ (अहान पोद्दार १५१, आदित्य रावळ ८०, एस. प्रजापती ६६, जय मालुसरे ३७, ए. देसाई नाबाद १९, लखमेश पावणे ८-१-२०-०, यश कसवणकर ४६.५-५-१८४-५, मनीष काकोडे ३६-१-१३७-१, अझान थोटा ३१-१-९९-३, दिशांक मिस्कीन ३.२-०-१५-१, मिहीर गावडे ६-०-२७-०, कौशल हट्टंगडी ०.१-०-१-०, देवनकुमार चित्तेम ४-०-१९-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT