Suyash Prabhudessai Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Suyash Prabhudessai IPL Auction 2025: आयपीएल 2025 साठीचा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबियामध्ये पार पडला.

Manish Jadhav

Suyash Prabhudessai IPL Auction 2025

आयपीएल 2025 साठीचा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबियामध्ये पार पडला. गोमंतकीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष गोव्याचा अष्टपैलू खेळाडू सुयश प्रभुदेसाई याच्याकडे लागले होते. लिलावादरम्यान सुयशसाठी मोठी बोली लागेल असे प्रत्येकाला वाटत होते, मात्र घोर निराशा झाली. सुयश अनसोल्ड राहिला.

सुयशला कोणत्याच संघाने घेतले नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी 30 लाख रुपयांच्या बेस प्राइजसह सुयशने नोंदणी केली होती. 26 वर्षीय सुयश अष्टपैलू खेळाडू आहे, जो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजीही करतो. सुयशने गोव्यासाठी (Goa) अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्येही त्याने आपला जलवा दाखवून दिला आहे.

गोव्याचं प्रतिनिधीत्व

दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू सुयश गोव्याचं प्रतिनिधीत्व करतो. सुयशने आतापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामने, 47 लिस्ट ए सामने आणि 48 टी-20 सामने खेळले आहेत. रेड बॉल क्रिकेटमध्ये सुयशने अफलातून कामगिरी केली आहे. त्याने 11 बळी घेण्यासोबतच 6 ताबडतोब शतके आणि 14 अर्धशतके ठोकली आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने एक शतक आणि 7 अर्धशतकांसह 1190 धावा केल्या आहेत तर टी-20 मध्ये त्याने चार अर्धशतकांच्या मदतीने 949 धावा केल्या आहेत. व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही त्याने 9 विकेट्स घेतल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पदार्पण

सुयशने 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो या हंगामात 5 खेळला होता, ज्यामध्ये त्याने 67 धावा केल्या होत्या. 2023 मध्येही तो पुन्हा एकदा 5 सामने खेळला ज्यात 35 धावा काढल्या होत्या. मात्र IPL 2024 मध्ये सुयश केवळ एकच सामना खेळू शकला.

निराशा!

सुयश आयपीएल (IPL) 2025 च्या लिलावात अनसोल्ड राहीला. सुयशला कोणत्याही संघाने घेतले नाही. मात्र अष्टपैलू सुयश पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करेल, असे त्याचे चाहते म्हणत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT