Goa Cricket Team Oman Tour Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket Team Oman Tour: गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ ओमानमध्ये दाखल; दौऱ्यात दोन टी-20, तीन एकदिवसीय मिळून रंगणार एकूण 5 सामने

Goa senior cricket team Oman tour: गोव्याचा सीनियर पुरुष क्रिकेट संघ प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखालील ओमानमध्ये शनिवारी संध्याकाळी दाखल झाला.

Sameer Amunekar

पणजी: गोव्याचा सीनियर पुरुष क्रिकेट संघ प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखालील ओमानमध्ये शनिवारी संध्याकाळी दाखल झाला. या दौऱ्यात संघ दोन टी-२० आणि तीन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळेल.

ओमान दौऱ्याविरुद्ध गोव्याच्या संघाने बंगळूर सराव केला आणि संघ तेथूनच ओमानला रवाना झाला, असे गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव तुळशीदास शेट्ये यांनी सांगितले. ओमान क्रिकेट यांच्या निमंत्रणावरून संघ दौऱ्यात मालिका खेळत आहे. पहिला टी-२० सामना सोमवारी (ता. १०) संध्याकाळी साडेसहा वाजता खेळला जाईल. त्यानंतर ११ रोजी दुसरा टी-२० सामना होईल. एकदिवसीय लढती अनुक्रमे १३, १५ व १७ ऑगस्ट रोजी होतील.

ओमान दौऱ्यासाठी १५ सदस्यीय संघ शनिवारी रवाना झाला आणि संध्याकाळी तेथे पोहचला अशी माहिती शेट्ये यांनी दिली. या दौऱ्याच्या अनुषंगाने आपण दुलीप मेंडिस यांच्या संपर्कात सातत्याने असल्याचे त्यांनी नमूद केले. मेंडिस हे श्रीलंकेचे माजी कर्णधार असून आता ओमान क्रिकेटचे मुख्य विकास अधिकारी व क्रिकेट ऑपरेशन्स संचालक आहेत.

बंगळूर येथील सराव सत्रात वेगवान गोलंदाज शुभम तारी जायबंदी झाला. त्याच्या जागी हेरंब परब याची निवड करण्यात आली. मात्र ओमान रवाना होण्यास दोन दिवस बाकी असताना युवा फलंदाज सनथ नेवगी दुखापतग्रस्त झाला. आवश्यक तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्यास पुरेसा वेळ नसल्यामुळे सनथऐवजी बदली खेळाडू निवडण्यात आला नाही व पंधरा सदस्यीय संघ पाठविण्याचे ठरले, असे जीसीए सचिवाने सांगितले.

गोव्याच्या सीनियर पुरुष संघ १८ ऑगस्ट रोजी मायदेशी परतेल. लगेच त्यांचे बंगळूर येथे सराव शिबिर सुरू होईल. त्यानंतर गोव्याचा संघ रणजी स्पर्धा तयारीचा एक भाग या नात्याने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या (केएससीए) मल्टि-डे क्रिकेट स्पर्धेत खेळेल, अशी माहिती तुळशीदास शेट्ये यांनी दिली. गोव्याचा २०२६-२७ मोसमातील रणजी क्रिकेट मोहीम ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

दुसऱ्यांदा परदेश दौरा

गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघाचा हा दुसरा मोसमपूर्व परदेश दौरा आहे. दीड दशकापूर्वी गोव्याच्या संघाने दक्षिण आफ्रिकाचा दौरा केला होता व तेथे संघ सराव सामने खेळला होता.

गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ

स्नेहल कवठणकर, मंथन खुटकर, दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, दीपराज गावकर, हेरंब परब, विकास सिंग, चिगुरुपती व्यंकट, अभिनव तेजराणा, यश कसवणकर, शिवेंद्र भुजबळ, सुयश प्रभुदेसाई, जीवनकुमार चित्तेम, वासुकी कौशिक, फेलिक्स आलेमाव, मुख्य प्रशिक्षक ः दिनेश मोंगिया, गोलंदाजी प्रशिक्षक ः जे. कृष्ण राव, व्यवस्थापक ः सिद्धेश साळुंके.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reservation Removal: 'आरक्षण हटाव' आंदोलन म्हणजे फार्सच! संख्याबळाच्या राजकारणात 10 टक्के वर्ग स्वतंत्र राजकीय सत्ता कशी मिळवणार?

धर्मांतरविरोधी विधेयक म्हणजे फुटीचे षड्‌यंत्र, सरकारकडे आकडेवारीच नाही; विरियातो फर्नांडिस यांचा आरोप

Women's Asia Cup 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचं मिशन 'आशिया कप'! पहिल्याच सामन्यात थायलंडसमोर तगडं आव्हान, कुठे पाहाल LIVE सामना?

One Nation One Time: देशात Indian Standard Time अनिवार्य; मार्च 2027 पासून देशभर 'एक देश, एक वेळ' धोरण लागू; सरकारचा मोठा निर्णय

खरी कुजबुज: आता गोव्याचे ऑलिम्पिकचे स्वप्न

SCROLL FOR NEXT