Purvi Naik Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Swimming Championships: गोव्याची पोरगी चमकली! राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पूर्वी नाईकने जिंकले सलग दुसरे पदक

Purvi Naik: गोव्याच्या पूर्वी नाईक हिने ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सबज्युनियर जलतरण स्पर्धेत सलग दुसरे पदक जिंकले.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याच्या पूर्वी नाईक हिने ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धेत सलग दुसरे पदक जिंकले. बुधवारी तिने १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदकाची कमाई केली.

पूर्वी हिने मंगळवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींच्या गट तीनमधील २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत २ मिनिटे ३०.६२ सेकंद वेळेसह ब्राँझपदक पटकावले. बुधवारी पदकाचा रंग बदलताना तिने १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत १ मिनिट ०७.२३ सेकंद वेळेसह दुसरा क्रमांक पटकावला. हरियानाची सेरेना सरोहा हिने १ मिनिट ०६.६७ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत सकाळच्या सत्रातील पात्रता फेरीत पूर्वी हिने १ मिनिट ०७.७४ सेकंद वेळ नोंदविली होती, नंतर मुख्य शर्यतीतील कामगिरीत सुधारणा करत रौप्यपदकावर हक्क सांगितला.

मूळ हरवळे-साखळी येथील पूर्वी नाईक कांपाल-पणजी येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील जलतरण प्रशिक्षणार्थी आहे. तिला प्रशिक्षक टी. ए. सुजित यांचे मार्गदर्शन लाभले. ती कुजिरा येथील मुष्टिफंड हायस्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT