Football Fixing Goa Dainik Gomatnak
गोंयचें खेळामळ

Football Match Fixing: फुटबॉल मॅचफिक्सिंग प्रकरण! आरोपपत्रात 14 खेळाडूंचा समावेश; GFA समितीची चौकशी अंतिम टप्प्यात

Football Match Fixing Goa: फुटबॉल क्षेत्राला हादरा दिलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) नैतिकता समितीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील फुटबॉल क्षेत्राला हादरा दिलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) नैतिकता समितीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकरणी तब्बल २८८ पानी आरोपपत्र असून त्यात १४ फुटबॉलपटूंचा समावेश आहे.

आरोपपत्रातील बहुतांश खेळाडू शापोरा युवक संघातील आहेत. गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या या संघाने ऑक्टोबर २०२५ अखेरीस झालेल्या मॅच फिक्सिंग आरोपानंतर नऊ खेळाडूंना डच्चू दिला होता. क्लबने याप्रकरणी जीएफएकडे तक्रार नोंदवून म्हापसा पोलिस स्थानकात एफआयआर नोंद केली होती.

मॅच फिक्सिंग प्रकार २०२५-२६ मोसमातील गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांत झाल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत जीएफएने चौकशीसाठी निवृत्त पोलिस उपअधीक्षक संदेश टी. चोडणकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती कली होती. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल जीएफए नैतिकता समितीला सादर केला.

चौकशी अधिकाऱ्याने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जीएफए नैतिकता समितीने रोहन कृष्णा पेडणेकर, आकाश अमृत कुडणेकर, आकाश सनदी, भास्कर जल्मी, कृष्णनाथ शिरोडकर, विनायक राणे, चैतन डाभोलकर, सचिदानंद साटेलकर, अमन गोवेकर, मिनेश कुंकळकर, सतीश काणकोणकर, मौझ्झन शेख, सूरज हडकोणकर व रोनाल्डो ऑलिव्हेरा यांना आरोपपत्र बजावले असून त्यांना उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मार्च महिन्याच्याच्या आरंभी जीएफए नैतिकता समितीची बैठक होईल. त्यावेळी या प्रकरणातील संभाव्य शिक्षांवर विचारविनिमय करण्यात येणार असल्याचे जीएफएने नमूद केले आहे.

दोषींवर कठोर कारवाई ः कायतान फर्नांडिस

मॅच फिक्सिंग चौकशीसंदर्भात जीएफएचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी सांगितले की, “२०२२ मध्ये जीएफएची सूत्रे हाती घेतल्यानंतर मी क्लबांना गोव्यातील फुटबॉलमधील ही घातक प्रवृत्ती संपविण्याचे आणि प्रणाली स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. त्या दिशेने आम्ही ठोस पावले उचलली आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर जीएफए कार्यकारिणी कठोरात कठोर कारवाई करेल.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT