Churchill Brothers Vs Sesa Academy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League 2024: चर्चिल ब्रदर्सचा चौथा पराभव! अजूनही गुणाच्या प्रतीक्षेत

Goa Professional Football League: ब्रदर्सच्या अथर्व दांडेकर याने सेझा अकादमीच्या संकल्प काणकोणकर याला गोलक्षेत्रात पाडले होते. नंतर ज्योबर्न कार्दोझ याचा ताकदवान फटका गोलपट्टीला आपटल्यामुळे चर्चिल ब्रदर्सची आघाडीची संधी हुकली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले. रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सेझा फुटबॉल अकादमीने त्यांच्यावर २-० फरकाने मात केली.

सेझा अकादमीचा कर्णधार सिद्धार्थनाथ गावस याने पेनल्टी फटक्यावर २०व्या मिनिटास आघाडीचा गोल केला. यावेळी चर्चिल ब्रदर्सच्या अथर्व दांडेकर याने सेझा अकादमीच्या संकल्प काणकोणकर याला गोलक्षेत्रात पाडले होते. नंतर ज्योबर्न कार्दोझ याचा ताकदवान फटका गोलपट्टीला आपटल्यामुळे चर्चिल ब्रदर्सची आघाडीची संधी हुकली.

६९व्या मिनिटास मायरन परेराच्या पासवर संकल्प काणकोणकर याने शानदार गोल केल्यामुळे सेझा अकादमीची आघाडी भक्कम बनली. सेझा अकादमीचा हा दोन सामन्यांतील पहिला विजय असून त्यांचे तीन गुण झाले आहेत. चर्चिल ब्रदर्सला चौथ्या पराभवामुळे गुणाच्या प्रतीक्षेत राहावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT