Goa vs Oman T20 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa vs Oman T20: गोव्याकडून ओमानला विजयाची 'भेट'; मोहित रेडकर, दीपराज गावकरचा बोथट मारा; क्षेत्ररक्षणही गचाळ

Oman Beats Goa Cricket: ओमान क्रिकेट अकादमीच्या मैदानावर मंगळवारी रात्री झालेल्या टी-२० क्रिकेट सामन्यात ओमानने तीन विकेट्स राखून बाजी मारली आणि दोन सामन्यांची मालिका २-० फरकाने जिंकली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या ओमानवर ऐतिहासिक विजय नोंदविण्याची गोव्याला नामी संधी होती, परंतु मोहित रेडकर व दीपराज गावकर यांचा निर्णायक टप्प्यात बोथट मारा, तसेच अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण यामुळे संघाने विजयाच्या उंबरठ्यावरुन पराभवाला अलिंगन दिले आणि यजमानांना सामना जिंकण्यास मदत केली.

ओमान क्रिकेट अकादमीच्या मैदानावर मंगळवारी रात्री झालेल्या टी-२० क्रिकेट सामन्यात ओमानने तीन विकेट्स राखून बाजी मारली आणि दोन सामन्यांची मालिका २-० फरकाने जिंकली. आता गुरुवारपासून (ता. १३) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल.

गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५० धावा केल्यानंतर ओमानने १९.५ षटकांत ७ बाद १५४ धावा करून सामना जिंकला. गोव्याला विजयाची नामी संधी असताना क्षेत्ररक्षकांनी किमान अर्धा डझन झेल सोडून यजमान संघाला मदत केली. त्यातच अखेरच्या पाच षटकांत ऑफस्पिनर मोहित रेडकर व कर्णधार मध्यमगती दीपराज गावकर यांनी अतिशय खराब गोलंदाजी केली.

१४व्या षटकाअखेरीस ओमानचा संघ ६ बाद ७७ धावा असा चाचपडत होता. अखेरच्या ३६ चेंडूंत त्यांना ७४ धावांची गरज होती व फक्त चार विकेट बाकी होत्या. १५ ते २० व्या षटकापर्यंत मोहित व दीपराज यांनी एकत्रित चार षटकांत प्रतिस्पर्ध्यांना ६२ धावांची बक्षिसी देत गोव्याला पराभवाच्या खाईत ढकलले.

अखेरच्या षटकात ओमानला विजयासाठी ६ चेंडूंत १३ धावांची गरज होती. नंतर ३ चेंडूंत ६ धावांची गरज असताना मोहितने नो-बॉल टाकला, अतिरिक्त चेंडू व फ्री-हिटमुळे यजमान संघाचे लक्ष्य खूपच सोपे झाले आणि एक चेंडू राखून त्यांनी सामना जिंकला. चांगली गोलंदाजी केलेला डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याच्याकडे झालेले दुर्लक्ष गोव्यासाठी नुकसानकारक ठरले.

त्यापूर्वी, वासुकी कौशिक (२-१७), फेलिक्स आलेमाव (१-२२) व १८ वर्षीय चिगुरुपती व्यंकट (२-२२) या वेगवान त्रिकुटाने छान मारा करत ओमानला कोंडीत पकडले होते.

संक्षिप्त धावफलक

गोवा: २० षटकांत ९ बाद १५० पराभूत वि. ओमान ः१९.५ षटकांत ७ बाद १५४ (जितेन रामानंदी नाबाद ३२, हसनैन अली शाह २७, शाह फैझल नाबाद १९, वासुकी कौशिक ४-०-१७-२, फेलिक्स आलेमाव ४-०-२२-१, दर्शन मिसाळ २-०-९-०, चिगुरुपती व्यंकट ४-०-२२-२, मोहित रेडकर ३.५-०-५४-२, दीपराज गावकर २-०-२७-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT