Digambar kamat  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Swimming Pool: गोव्यात आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचा प्रस्ताव! आमदार कामत यांची माहिती; मोठ्या स्पर्धा घेणे शक्य

Goa International Swimming Pool: कामत यांची जागतिक जलतरण (वर्ल्ड ॲक्वेटिक) या जलतरणातील सर्वोच्च संघटनेच्या सर्वसाधारण मंडळात आशियाई खंडाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी २०२५-२०२९ या कालावधीसाठी निवड झाली आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्याचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केला आहे, संबंधित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात मोठ्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा घेणे शक्य होईल, असा विश्वास मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केला.

हल्लीच माजी मुख्यमंत्री कामत यांची जागतिक जलतरण (वर्ल्ड ॲक्वेटिक) या जलतरणातील सर्वोच्च संघटनेच्या सर्वसाधारण मंडळात आशियाई खंडाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी २०२५-२०२९ या कालावधीसाठी निवड झाली आहे. भारताचे प्रतिनिधी म्हणून आपली निवड करण्यात आली आहे.

हल्लीच ११ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत सिंगापूर येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेच्या वेळेस जागतिक जलतरण संघटनेची परिषद झाली व त्यावेळी आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाले, असे आमदार कामत यांनी नमूद केले. संबंधित निवडीच्या अनुषंगाने त्यांनी संवाद साधता. आमदार कामत भारतीय जलतरण महासंघाचे तीन कार्यकाळासाठी अध्यक्ष होते, शिवाय सहा वर्षे त्यांनी गोवा जलतरण संघटनेचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

दिगंबर कामत यांनी माहिती दिली, की यावेळच्या आशियाई जलतरण स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले असून ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद येथे होईल. या स्पर्धेत आशिया खंडातील अधिकाधिक देश भाग घेणार असून गुजरात सरकारचे पूर्ण सहकार्य लाभत असून स्पर्धेसाठी सर्वसुविधायुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. आशियाई स्पर्धा आयोजनानिमित्त जागतिक जलतरण महासंघाचे निरीक्षण अहमदाबाद येथे एकंदरीत व्यवस्थेची पाहणी करतील. भारत २०२६ मधील ऑलिंपिक स्पर्धेचे यजमान भूषविण्यास इच्छुक आहे, असल्याचेही आमदार कामत यांनी नमूद केले.

जलतरणात भारताची प्रगती

जलतरणात भारतीय प्रगती साधत असल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. पूर्वी जागतिक स्पर्धेसाठी भारतीय जलतरणपटूंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळत असे. यंदा प्रथमच सहा भारतीय जलतरणपटूंनी निकष वेळ नोंदवून पात्रता मिळविली. ही चांगली सुधारणा आहे. भारतात ग्लेनमार्क, जिंदाल तसेच बंगळूर येथील जलतरण अकादमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. या अकादमीमध्ये विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जलतरण महासंघाने ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे भविष्यात ऑलिंपिक व जागतिक जलतरण स्पर्धांत भारतीय जलतरणपटूंकडून पदकांची अपेक्षा बाळगता येईल, असा विश्वास आमदार कामत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT