Goa Sports Complex Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Campal Sports Complex Goa: कांपाल येथे सुमारे ३५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली बहुउद्देशीय क्रीडा व व्यापारी सुविधा खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: कांपाल येथे सुमारे ३५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली बहुउद्देशीय क्रीडा व व्यापारी सुविधा खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सुविधेच्या संचालनासाठी १० वर्षांच्या व्यापारी परवान्याअंतर्गत खासगी संचालकाची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या प्रक्रियेसाठी गोवा राज्य नागरी विकास संस्थेने (जीसुडा) विशेष सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. ही संस्था निविदा प्रक्रिया, अटी-शर्ती, आर्थिक आराखडा तसेच खासगी संचालकाची निवड या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन व व्यवस्थापन करणार आहे.

सुमारे ४० हजार चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या संकुलात नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान, क्रीडा प्रशिक्षण अकादमीसाठी जागा, सुमारे ४०० ते ५०० चौरस मीटरचे उच्च दर्जाचे उपाहारगृह, वाहनतळाची सुविधा तसेच जाहिरातींसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. क्रीडा उपक्रमांसह व्यापारी उपक्रमांद्वारे या संकुलाचा अधिक प्रभावी वापर करण्याचा सरकारचा उद्देश आहे.

महत्त्वाच्या अटी

खासगी संचालकासोबत करण्यात येणाऱ्या करारात काही महत्त्वाच्या अटींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी ३० दिवस ही सुविधा शासनाच्या कार्यक्रमांसाठी कोणतेही शुल्क न आकारता उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तसेच क्रीडा अकादमीत स्थानिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील जीएसयूडीएने नामनिर्देशित केलेल्या युवकांसाठी किमान १० टक्के जागा विनामूल्य राखून ठेवणे बंधनकारक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decision: 'इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी'ची पुनर्रचना, राज्यस्तरीय शहरी विकास संस्थेला मंजुरी... मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय

NZ ODI Squad vs India: टीम इंडियाविरुद्ध भिडण्यासाठी न्यूझीलंड सज्ज! फिन अ‍ॅलन, लॉकी फर्ग्युसनसह अनेक खेळाडूंचं कमबॅक, पाहा संपूर्ण संघ

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT