Dabolim Plot Fraud: 53 लाख घेतले, पण प्लॉटविक्रीच्या नावावर फसवले! दाबोळीतील घटना; भोपाळच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Bhopal person land scam Goa: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल सिंग कौरव याने आपण दाबोळी येथील निवासी भूखंडाचा मालक व अधिकृत विक्रेता असल्याचे भासवले.
Dabolim residential plot fraud
Dabolim residential plot fraudDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : दाबोळी येथे निवासी भूखंड देण्याचे आमिष दाखवून ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोपाळ (मध्यप्रदेश) येथील कमल सिंग कौरव याच्याविरोधात वास्को पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे भूखंड खरेदी व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल सिंग कौरव याने आपण दाबोळी येथील निवासी भूखंडाचा मालक व अधिकृत विक्रेता असल्याचे भासवले. त्याने संबंधित तक्रारदाराला आकर्षक दरात भूखंड देण्याचे आश्वासन दिले. ऑगस्ट २०२२ पासून आजतागायत टप्प्याटप्प्याने एकूण ५३ लाख रुपये त्याने स्वीकारले. यामध्ये ४६ लाख रुपये बँकेमार्फत तर ७ लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले.

Dabolim residential plot fraud
Goa Crime: कुंपणच शेत खातं तेंव्हा..! अपघात झाला, चालक झाला गंभीर जखमी; संधी साधून कॉन्स्टेबलने पळवले 8 लाखांचे दागिने

मात्र संपूर्ण रक्कम दिल्यानंतरही आरोपीने भूखंडाच्या कागदपत्रांची पूर्तता न करता वेळकाढूपणा सुरू ठेवला. वारंवार पाठपुरावा करूनही व्यवहार पूर्ण होत नसल्याने तक्रारदाराला संशय आला. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वास्को पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Dabolim residential plot fraud
Land Conversion: 'जमीन रुपांतरणाचे कलम 39A रद्द होणे अशक्य'! मंत्री राणेंचे स्पष्टीकरण; मुख्यमत्र्यांसोबतच्या ‘ट्युनिंग'वर केले भाष्य

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्लेटो कार्व्हालो पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, कोणताही भूखंड किंवा मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी मालकी हक्काची कागदपत्रे, परवानग्या व व्यवहाराची कायदेशीर पडताळणी करूनच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com