India U19 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

India Under 19 Asia Cup Team: गोव्याचा युवा मध्यमगती गोलंदाज चिगुरुपती व्यंकट याला आगामी १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याचा युवा मध्यमगती गोलंदाज चिगुरुपती व्यंकट याला आगामी १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. यासंबंधी माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनकडून (जीसीए) शनिवारी देण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ज्युनियर क्रिकेट समितीने शुक्रवारी १९ वर्षांखालील पुरुष आशिया करंडक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ निवडला होता, पण शाविन विनोद जायबंदी ठरल्यामुळे त्याच्या जागी व्यंकटची निवड झाली. अगोदर व्यंकट राखीव होता. जीसीए अध्यक्ष महेश देसाई, उपाध्यक्ष परेश फडते, सचिव तुळशीदास शेट्ये, खजिनदार अब्दुल माजिद, तसेच व्यवस्थापकीय समितीने व्यंकटचे अभिनंदन केले आहे.

आशिया करंडक स्पर्धा ओमानमध्ये खेळली जाणार असून भारताच्या गटात संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान व नेपाळ हे संघ आहेत. सहा नोव्हेंबरला भारतीय संघ नेपाळविरुद्ध खेळेल. त्यानंतर अनुक्रमे पाकिस्तान व संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध लढत होईल. सर्व लढती मस्कत येथे होतील. लक्ष्य रायचंदानी भारतीय संघाचा कर्णधार असून भारताचे महान क्रिकेटपटू राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांचे सुपुत्र अनुक्रमे अन्वय द्रविड व आर्यवीर सेहवाग यांचाही संघात समावेश आहे.

मागील सप्टेंबरमध्ये भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९ वर्षांखालील एकदिवसीय मालिकेत व्यंकट भारतीय संघातून खेळला होता. त्याने दोन सामन्यांत चार गडी बाद केले. त्यापूर्वी, जुलैमध्ये कोलंबो येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या १९ वर्षांखालील युवा कसोटी (मल्टि-डे) मालिकेतील सामन्यात व्यंकटने दोन्ही डावांत मिळून पाच गडी टिपले होते. १९ वर्षांखालील विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीस गोव्यातर्फे खेळताना व्यंकटने चार सामन्यांत आठ गडी बाद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

ST Reservation: गोव्याचे शिष्टमंडळ उद्या दिल्लीत सॉलिसिटर जनरल, जनगणना आयुक्तांची घेणार भेट

SCROLL FOR NEXT