Goa Cricket Association fake selection warning Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket Association: रणजी, अंडर-19 क्रिकेट संघात सिलेक्शनसाठी पैशांची मागणी; GCAने उघड केलं 'त्या' मेसेजचं सत्य

Goa Cricket Association fake selection warning: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या विविध वयोगटातील क्रिकेट संघांमध्ये निवड करून देण्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर फसव्या मेसेजचे पेव फुटले आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) अंतर्गत येणाऱ्या विविध वयोगटातील क्रिकेट संघांमध्ये निवड करून देण्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर फसव्या मेसेजचे पेव फुटले आहे. या पार्श्वभूमीवर, गोवा क्रिकेट असोसिएशनने एक जाहीर पत्रक काढून खेळाडू आणि त्यांच्या पालकांना अशा फसव्या मेसेजेस आणि कॉलपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, क्रिकेट संघातील निवडीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत.

रणजी आणि अंडर-१९ संघांचे खोटे आमिष

सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या संदेशांमध्ये गोव्याच्या 'अंडर-१९' (U-19), 'अंडर-२३' (U-23) आणि प्रतिष्ठित 'रणजी ट्रॉफी' (Ranji Trophy) संघांमध्ये थेट निवड करून देण्याचे खोटे आश्वासन दिले जात आहे. यासाठी काही विशिष्ट मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणी फी (Registration Fees) किंवा निवड शुल्क म्हणून पैशांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित: महेश देसाई

या संपूर्ण प्रकरणावर गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश देसाई (Mahesh Dessai) यांनी कडक शब्दांत भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "गोवा क्रिकेट असोसिएशनची निवड पद्धती अत्यंत पारदर्शक असून ती केवळ आणि केवळ खेळाडूच्या गुणवत्तेवर (Merit-based) आधारित आहे. संघ निवडीसाठी कोणाकडूनही पैशांची आकारणी केली जात नाही."

पैशांची मागणी करणाऱ्यांना बळी पडू नका

गोवा क्रिकेट असोसिएशनने सर्व उदयोन्मुख खेळाडू आणि त्यांच्या पालकांना आवाहन केले आहे की, क्रिकेट असोसिएशनचे नाव सांगून जर कोणी पैशांची मागणी करत असेल किंवा अनधिकृत संदेश पाठवत असेल, तर त्याला अजिबात बळी पडू नका, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

SCROLL FOR NEXT