IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa IIT Project: फर्मागुढी-फोंडा येथे प्रस्तावित आयआयटी हे गोव्याचे कायमस्वरूपी संकुल पूर्णपणे सरकारी मालकीच्या जमिनीवरच उभारण्यात येणार आहे.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फर्मागुढी-फोंडा येथे प्रस्तावित आयआयटी हे गोव्याचे कायमस्वरूपी संकुल पूर्णपणे सरकारी मालकीच्या जमिनीवरच उभारण्यात येणार आहे. कोणत्याही खासगी किंवा धार्मिकस्थळाच्या जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

कटमगाळ दादा देवस्थानाजवळील या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. आपणही कटमगाळ दादा देवस्थानाबद्दल श्रद्धा बाळगतो. त्यामुळे देवस्थानच्या परिसरातील किंवा आजूबाजूची एक इंचही जमीन संपादन केली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

Goa CM Pramod Sawant
Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

फर्मागुढीतील आयआयटी प्रकल्पाला केवळ विरोधासाठी विरोध करू नये, असे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या विषयावर संबंधित मतदारसंघांचे आमदार सुदिन ढवळीकर आणि गोविंद गावडे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी संवाद साधल्यानंतरच प्रकल्प पुढे नेण्यात येत आहे.

राज्याच्या उच्च शिक्षण, संशोधन आणि रोजगारनिर्मितीसाठी आयआयटीचे कायमस्वरूपी संकुल महत्त्वाचे ठरणार असल्याचे मुख्‍यमंत्र्यांनी नमूद केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि राज्याच्या विकासासाठी या प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Goa CM Pramod Sawant
Goa Sindhudurg Sand Transport: गोवा-सिंधुदुर्ग रेती वाहतूक 8 दिवसांत सुरळीत! नीलेश राणेंचा विश्‍‍वास

सरकारची भूमिका

आयआयटीचा संपूर्ण प्रकल्प सरकारी जमिनीवरच उभारला जाईल

कटमगाळ दादा देवस्थान परिसरातील जमीन संपादित केली जाणार नाही

विकास, धार्मिक-सांस्कृतिक वारसा यांचा समतोल राखण्यास सरकार कटिबद्ध.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com