Goa Tennis Ball Cricket Winner Team  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: गोव्याच्या मुलींची तमिळनाडूत विजयी झेप! अंतिम लढतीत यजमान संघास सहा विकेटने हरवले

Goa Tennis Ball Cricket Team: मिनी राष्ट्रीय १४ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तमिळनाडूला नमविले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या मुलींनी अंतिम लढतीत यजमान तमिळनाडूस सहा विकेटने हरवून मिनी राष्ट्रीय १४ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले. स्पर्धा तमिळनाडू राज्यातील शोलिंगूर येथे झाली.

अंतिम लढतीत तमिळनाडूच्या मुलींनी निर्धारित सहा षटकांत ३ बाद २४ धावा केल्या. गोव्याच्या सनिका भोसले व पूजा राठोड यांनी प्रत्येकी विकेट मिळविली. प्रत्युत्तरादाखल गोव्याने २.१ षटकांत २ बाद २५ धावा करून विजेतेपदाच्या करंडकावर नाव कोरले.

आयुषी श्रीवास्तव हिने १७ धावा केल्या. त्यापूर्वी, उपांत्य लढतीत गोव्याने महाराष्ट्रावर सात धावांनी मात करून अंतिम फेरी गाठली होती. गोव्याच्या मुलांचे स्पर्धेतील आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT