Aarush Pawaskar Goa Badminton Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

French Badminton Tournament: गोव्याच्या 'आरुष'चा फ्रान्समध्ये डंका! बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद; अव्वल मानांकितांना धक्का

French Open Badminton Tournament: आरुष पंधरा वर्षांचा असून म्हापसा येथील असून सध्या तो बंगळूर येथे बॅडमिंटन प्रशिक्षण घेत आहे.

Sameer Panditrao

पणजी: उदयोन्मुख गोमंतकीय बॅडमिंटनपटू आरुष पावसकर याने फ्रान्समधील १७ वर्षांखालील फ्रान्स ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावताना अव्वल मानांकित खेळाडूंना पराभूत करण्याची किमया साधली. स्पर्धेत त्याने झुंझार खेळ प्रदर्शित केला.

आरुष याला अंतिम लढतीत तीन गेममध्ये निसटती हार पत्करावी लागली, त्यामुळे विजेतेपद हुकले. पराभूत होण्यापूर्वी त्याने डेन्मार्कच्या ॲक्सेल बोएसन याला २१-१५, २०-२२, १५-२१ असे झुंजविले.

त्यापूर्वी, आरुषने उपांत्य फेरीत इंग्लंडच्या साजन सेंथुरन याला २४-२२, २१-१८ असे, तर उपांत्यपूर्व लढतीत फ्रान्सचा द्वितीय मानांकित खेळाडू व्हिक्टर लू-रू याला २१-९, १४-२१, २१-१७ असे नमविले होते. याशिवाय आरुषने आगेकूच राखताना इंग्लंडचा जोएल जॉबी याला २१-१८, २१-१४ असे, युरोपातील सहावा मानांकित व स्पर्धेतील अव्वल मानांकित स्वित्झर्लंडचा सांतियागो अरावजो याला २१-१३, २०-२२ असे, तर स्वित्झर्लंडच्याच क्युन्टीन बॉशुंग याला २१-१८, २१-९ असे नमविले होते.

आरुष पंधरा वर्षांचा असून म्हापसा येथील असून सध्या तो बंगळूर येथे बॅडमिंटन प्रशिक्षण घेत आहे.

पाठीवर कौतुकाची थाप

फ्रान्समधील चमकदार कामगिरीबद्दल आरुष याचे गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे. "आरुष हा गोव्याचा अव्वल मानांकित खेळाडू असून त्याने राष्ट्रीय पातळीवर प्रतिभा सिद्ध केली आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय सब-ज्युनियर स्पर्धेची उपांत्यपूर्व गाठताना त्याने क्षमता सिद्ध केली होती. तो अतिशय प्रतिभावान खेळाडू असून त्याची निष्ठा व मेहनत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या रौप्यपदकाचा गोवा बॅडमिंटन असोसिएशनला अभिमान आहे. त्याच्या वाटचालीत अमूल्य योगदान देणारे प्रशिक्षक उत्सव मिश्रा, उद्‍भव बॅडमिंटन अकादमी, गोवा कार्बन लिमिटेड, योनेक्स सनराईज इंडिया, भारतीय बॅडमिंटन असोसिएशनप्रती आम्ही आभारी आहोत. आरुषचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे आणि तो सातत्याने यश संपादन करत राहील याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे," असे पाटील यांनी युवा बॅडमिंटनपटूचे कौतुक करताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT