Cricket Canva
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: प्लेट विजेतेपदासाठी गोवा व नागालँड यांच्यात रंगणार लढत! दोन्ही संघ पुढील एलिट विभागासाठी पात्र

Ranji Cricket Trophy 2024: रणजी करंडक प्लेट विभागीय विजेतेपदासाठी गोवा व नागालँड यांच्यात येत्या २३ ते २६ जानेवारी या कालावधीत अंतिम लढत होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa vs Nagaland in Ranji Trophy Plate Division 2024

पणजी: रणजी करंडक प्लेट विभागीय विजेतेपदासाठी गोवा व नागालँड यांच्यात येत्या २३ ते २६ जानेवारी या कालावधीत अंतिम लढत होणार आहे. गटात गोव्याने ३३ गुणांसह अव्वल स्थान मिळविले, तर नागालँडला २३ गुणांसह दुसरा क्रमांक मिळाला. दोन्ही संघ २०२५-२६ मोसमातील रणजी स्पर्धेच्या एलिट गटात खेळण्यास पात्र ठरले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्लेट विभाग अंतिम लढतीचे केंद्र जाहीर केलेले नाही. सहा संघांच्या प्लेट विभागात गोव्याने सर्व पाचही सामने जिंकले, तर नागालँडने तीन विजय, एक पराभव व एक अनिर्णित या कामगिरीसह २३ गुणांची कमाई केली. गोव्याचे माजी कर्णधार स्वप्नील अस्नोडकर नागालँडचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत.

साखळी फेरीत पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत गोव्याने नागालँडला ८३ धावांनी हरविले, पण त्या लढतीत पाहुण्या संघाने यजमानांना चांगलेच झुंजविले होते. गटातील अखेरच्या सामन्यात नागालँडने नादियाड येथे शनिवारी मिझोरामविरुद्धच्या अनिर्णित लढतीत आघाडीचे तीन गुण प्राप्त केले.

आता रंगणार झटपट क्रिकेट

रणजी स्पर्धा आता खंडित झाली असून सर्व संघ झटपट क्रिकेट स्पर्धेत खेळतील. त्यानंतर जानेवारीत पुन्हा रणजी स्पर्धा पुढे खेळली जाईल. २३ नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२०, तर २१ डिसेंबरपासून विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा खेळली जाईल. टी-२० स्पर्धेत गोव्याचा ई गटात समावेश असून सामने हैदराबाद, तर गोव्याच्या अ गटातील एकदिवसीय सामने जयपूर येथे होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT