GCA Premier League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA Premier League: दर्शन, गौरेश, फेलिक्स यांचे झुंझार प्रयत्न अखेर अपुरे; धेंपो क्लबला गतविजेत्या चौगुले संघाविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांची आघाडी

GCA Premier League match results 2026: धेंपो क्रिकेट क्लबने पहिल्या डावास जवळपास साडेसहाशे धावांचा डोंगर उभारल्यानंतर मध्यंतरी पडझड होऊनही चौगुले स्पोर्टस क्लबने पूर्ण माघार घेतली नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: धेंपो क्रिकेट क्लबने पहिल्या डावास जवळपास साडेसहाशे धावांचा डोंगर उभारल्यानंतर मध्यंतरी पडझड होऊनही चौगुले स्पोर्टस क्लबने पूर्ण माघार घेतली नाही. कर्णधार दर्शन मिसाळ व गौरेश कांबळी यांची शतके, तसेच फेलिक्स आलेमावच्या जबाबदार अर्धशतकाच्या बळावर गतविजेत्यांनी झुंझार प्रत्युत्तर दिले, पण अखेर आघाडीसाठी दीडशे धावा कमी पडल्या.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीचा तिसरा दिवस चौगुले क्लबच्या त्रिकुटाने गाजविला. दर्शनने १२३, गौरेशने १०५, तर फेलिक्सने ७५ धावा केल्या. धेंपो क्लबची फिरकी गोलंदाज मोहित यादवने पाच गडी बाद केले. पिंक बॉल डे-नाईट लढत पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू आहे.

धेंपो क्लबच्या ६४६ धावांना उत्तर देताना चौगुले क्लबचा डाव दुसऱ्या दिवसअखेरच्या ३ बाद १२८ वरून शुक्रवारी प्रकाशझोतातील तिसऱ्या सत्रात ४९७ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात १४९ धावांची आघाडी घेतलेल्या धेंपो क्रिकेट क्लबला दर्शन मिसाळने दोन झटके दिल्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर त्यांची २ बाद १६ झाली होती व एकूण आघाडी १६५ धावांची आहे. सामन्याचा शनिवारी चौथा व अखेरचा दिवस आहे.

चौगुले क्लबचा सलामी फलंदाज गौरेश कांबळी याने शानदार शतक झळकावले. त्याने प्रद्युम्न अटपडकर (३९) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. शतकानंतर लगेच राहुल मेहताने गौरेशला पायचीत करून जम बसलेली जोडी फोडली. गौरेशने १४२ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार मारले. प्रद्युम्न धावसंख्येत आणखी सात धावांची भर पडल्यानंतर बाद झाला. नंतर कर्णधार डावखुरा फलंदाज दर्शन मिसाळ याने अगोदर शिवेंद्र भुजबळ (३५) याच्यासह सहाव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली.

मोहित यादवने शिवेंद्रला यष्टिचीत बाद करून भागीदारी संपुष्टात आणली. चौगुले क्लबची ७ बाद २८० अशी स्थिती असताना धेंपो क्लबला मोठी आघाडी खुणावत होती. निर्णायक टप्प्यावर दर्शनला फेलिक्स आलेमाव याने मोलाची साथ दिल्यामुळे धेंपो क्लबचे गोलंदाज दबावाखाली आले. फेलिक्सला मोहित यादवने त्रिफळाचीत केल्याने धेंपो क्लबला मोठा दिलासा मिळाला व आठव्या विकेटची १६७ धावांची भागीदारी खंडित झाली.

फेलिक्सने १२८ चेंडूंतील खेळीत दहावेळा चेंडू सीमापार केला. दर्शनलाही त्रिफळाचीत करून मोहितने डावातील पाचवी विकेट मिळविली आणि चौगुले क्लबसाठी हा मोठा झटका ठरला. नवव्या विकेटच्या रुपात बाद झालेल्या दर्शनने १५१ चेंडूंना सामोरे जात नऊ चौकार व चार षटकार खेचले.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्लब, पहिला डाव ः ९ बाद ६४६ घोषित व दुसरा डाव ः ४ षटकांत २ बाद १६ (दर्शन मिसाळ २-१३) विरुद्ध चौगुले क्लब, पहिला डाव (३ बाद १२८ वरून) ः ११०.३ षटकांत सर्वबाद ४९७ (गौरेश कांबळी १०५, प्रद्मुम्न अटपडकर ३९, शिवेंद्र भुजबळ ३५, दर्शन मिसाळ १२३, फेलिक्स आलेमाव ७५, शुभम तारी २४, मोहित यादव ५-११५, अभिनव तेजराणा ३-१३२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT