FC Goa Borja Herrera Canva
गोंयचें खेळामळ

FC Goa: 'हेर्रेरा'ची सामन्यानंतरही दिलदार कामगिरी! ईस्ट बंगालच्या चाहत्यांप्रती केला 'असा' आदर व्यक्त; म्हणाला की..

ISL 2024-25: ईस्ट बंगालसोबत येथे असताना अत्यंत संतोषजनक वेळ व्यतित केला, निरोप घेताना मी त्यांना फक्त `धन्यवाद` म्हणू शकतो; बोर्हा हेर्रेरा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अकराव्या मोसमातील पहिल्या विजयात बोर्हा हेर्रेरा याची हॅटट्रिक निर्णायक ठरली, पण तिन्ही गोलच्या वेळेस ३१ वर्षीय स्पॅनिश खेळाडूने कोलकता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर मोठा जल्लोष केला नाही. ईस्ट बंगालच्या चाहत्यांप्रती आदर व्यक्त करताना आपण ते टाळल्याचे स्पष्टीकरण त्याने नंतर दिले.

आक्रमक शैलीचा मध्यरक्षक बोर्हा हेर्रेरा यावर्षी जानेवारीपर्यंत ईस्ट बंगाल संघात होता, नंतर २०२३-२४ मोसमाच्या मध्यास त्याने एफसी गोवा संघाशी करार केला. आपल्या जुन्या संघाविरुद्ध कोलकत्यात खेळताना त्याने यावेळच्या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदविली. एफसी गोवाने सामना ३-२ अशा फरकाने जिंकला,

हेर्रेरा म्हणाला, की ``मी हा क्लब (ईस्ट बंगाल) आणि त्यांच्या चाहत्यांचा खूप मानतो. (जुन्या मित्रांना भेटून) मला अतिशय आनंद झाला. त्यामुळे मी माझ्या गोलचा जल्लोष केला नाही, कारण मी चाहत्यांचा खूप आदर करतो. ते मला खूप प्रोत्साहन देतात आणि सातत्याने संदेश पाठवत असतात. या ठिकाणी खेळताना खूप आल्हाददायक वाटते.

ईस्ट बंगालसोबत येथे असताना अत्यंत संतोषजनक वेळ व्यतित केला. निरोप घेताना मी त्यांना फक्त `धन्यवाद` म्हणू शकतो.`` प्रशिक्षक मानोला मार्केझ यांनी हेर्रेराने तीन गोल केल्यानंतर ८४ व्या मिनिटास त्याला माघारी बोलावले. यावेळी डगआऊटकडे येणाऱ्या हेर्रेराला स्टेडियमवरील चाहत्यांनी मोठ्या संख्येने उभे राहून शानदार मानवंदना दिली. तो खेळत असताना चाहते त्याच्या नावाचा सतत उदघोष करत होते.

आम्ही जिंकण्यासाठी लायक होतो; मार्केझ

सामन्यानंतर एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ म्हणाले, की “आम्ही सामन्याची सुरवात चांगली केली, दोन गोल केले, आम्ही चिकित्सक होतो. सलग दोन पराभवानंतर ईस्ट बंगाल संघ कोलमडलेला असल्याने सामना संपवून टाकण्याची योग्य संधी आहे असे मला वाटते, पण त्यांनी पेनल्टीसह पुनरागमन केले.`` ते पुढे म्हणाले की, “कार्ल मॅकह्यूच्या रेड कार्डनंतर आमच्यासाठी काही समस्या उदभवल्या हे खरे आहे, पण आम्ही सामना जिंकण्यासाठी लायक होतो हीच माझी भावना आहे.``

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT