FC Goa against Rangdajied United Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Durand Cup 2024: जबरदस्त मुसंडी मारत एफसी गोवाच्या नवोदितांची विजयी सलामी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाच्या नवोदित खेळाडूंनी जबरदस्त खेळ करताना पिछाडीवरून मुसंडी मारत १३३व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत सोमवारी विजयी सलामी दिली. त्यांनी ऐनवेळी स्पर्धेत प्रवेश मिळालेल्या मेघालयातील रंगदाजिएद युनायटेडचा कडवा प्रतिकार ४-३ फरकाने मोडून काढताना झुंजार विजयाची नोंद केली.

भर पावसात झालेला ‘फ’ गटातील सामना मेघालयातील शिलाँग येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. एकूण सात गोल झालेला सामना रंगतदार ठरला. भरपाई वेळेतील खेळात ९०+६व्या मिनिटास शानदार विजयी गोल करणारा व्हेलिंग्टन फर्नांडिस एफसी गोवाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

त्यापूर्वी, १९व्या मिनिटास ओवनिजुह पाजुह याच्या गोलमुळे स्थानिक संघाला आघाडी मिळाली. विश्रांतीनंतर लगेच एफसी गोवाने बरोबरी साधली. ४८व्या मिनिटास कर्णधार लिअँडर डिकुन्हाचा पेनल्टी फटका रंगदाजिएदच्या गोलरक्षकाने अडविला, पण रिबाऊंडवर लिअँडरनेच संघाची पिछाडी भरून काढली.

नंतर ५८व्या मिनिटास देवेंद्र मुरगावकर याने एफसी गोवासाठी गोल केल्यानंतर लगेच ६१व्या मिनिटास पिनभालांग सुटिंग याने रंगदाजिएदला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

एफसी गोवास सामन्यातील अखेरची दहा मिनिटे बाकी असताना पेनल्टी फटका मिळाला. यावेळी लाल्थानलियाना याने ८०व्या मिनिटास अचूक नेम साधल्यामुळे एफसी गोवाच्या खाती ३-२ अशी आघाडी जमा झाली, मात्र अपबोर्लांग कुरबाह याने ८५व्या मिनिटास स्थानिक संघाला पुन्हा बरोबरी साधून दिली.

इस्त्राईल गुरुंग यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवा संघाचा गटातील पुढील सामना आठ ऑगस्ट रोजी त्रिभुवन आर्मी एफसी संघाविरुद्ध होईल. शिलाँग लाजाँग एफसी हा गटातील अन्य संघ आहे. हैदराबाद एफसीने अखेरच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे रंगदाजिएद युनायटेडला स्पर्धेत संधी देण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT