Yanglem Sanatomba Singh: आरएफवायसी अकादमीत प्रशिक्षण घेत असताना सानाटोंबा याने चमकदार खेळ केला आहे
Yanglem Sanatomba SinghDainik Gomantak

FC Goa: एफसी गोवा संघात नवा चेहरा; १८ वर्षीय सानाटोंबाचे आगमन

Yanglem Sanatomba Singh: आरएफवायसी अकादमीत प्रशिक्षण घेत असताना सानाटोंबा याने चमकदार खेळ केला आहे
Published on

पणजी: एफसी गोवा संघाने २०२४-२५ फुटबॉल मोसम सुरू होण्यापूर्वी आणखी एका युवा खेळाडूस संघात सामावून घेतले. १८ वर्षीय फुल-बॅक खेळाडू सानाटोंबा सिंग यांग्लेम बचावफळीतील नवा चेहरा आहे.

सानाटोंबा हा रिलायन्स फाऊंडेशन यंग चँप्स (आरएफवायसी) अकादमीचा प्रशिक्षणार्थी आहे. आरएफवायसी अकादमीत प्रशिक्षण घेत असताना सानाटोंबा याने चमकदार खेळ केला. या अकादमीतर्फे तो ४२ सामन्यांत २८२४ मिनिटे खेळला. चार असिस्टची, तसेच १८ क्लीन शीट्सची नोंद केली.

Yanglem Sanatomba Singh: आरएफवायसी अकादमीत प्रशिक्षण घेत असताना सानाटोंबा याने चमकदार खेळ केला आहे
Manolo Marquez: FC Goa चे मार्गदर्शक मानोलो आता भारतीय संघाचे हेड कोच; दुहेरी जबाबदारी

``एफसी गोवाशी करारबद्ध झाल्याने आनंदित आहे. या पातळीवर भारतातील दिग्गज क्लबच्या मुख्य संघात संधी मिळण्याची मला अपेक्षा नव्हती. युवा खेळाडू या नात्याने मला आव्हानांची जाणीव आहे. प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली मी प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध असून माझ्या विकासासाठी एफसी गोवा योग्य असल्याचे मी मानतो,`` असे सानाटोंबा याने सांगितले.

``तांत्रिकदृष्ट्या प्रभावी, भक्कम बचावपटू असलेला सानाटोंबा मैदानावर आक्रमकता प्रदर्शित करतो, त्यामुळे त्याला रोखणे प्रतिस्पर्ध्यांना अवघड ठरते,`` असे संघातील नव्या खेळाडूविषयी एफसी गोवाचे मार्गदर्शक मानोलो मार्केझ यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com