Professional League 2024 Canva
गोंयचें खेळामळ

Indian Super League: एफसी गोवाचा विजय रथ नॉर्थईस्ट युनायटेडने रोखला, बरोबरीवर मानावे लागले समाधान; अखेरच्या टप्प्यात फिरला सामना

FC Goa vs NorthEast United: सामन्यानंतर ५६ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक म्हणाले, की ‘‘आम्ही लीग शिल्डसाठी झुंजत आहोत. त्या कारणास्तव आम्ही महत्त्वाकांक्षी आहोत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आम्ही महत्त्वाकांक्षी असल्याने तीन गुण हवे होते, पण तुम्ही जिंकू शकत नसल्यास शून्याऐवजी एक गुण मिळणेही चांगलेच, अशी प्रतिक्रिया एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडने बरोबरीत रोखल्यानंतर दिली.

गुवाहाटी येथे मंगळवारी रात्री झालेला सामना १-१ असा गोलबरोबरीत राहिला. सामन्याच्या ६५व्या मिनिटास महंमद यासीरच्या गोलमुळे एफसी गोवाने आघाडी घेतल्यानंतर सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी पुन्हा गोल स्वीकारला, त्यामुळे बरोबरीवर समाधान मानावे लागले. हैदराबाद एफसीविरुद्ध भरपाई वेळेतील गोलमुळे एफसी गोवास (FC Goa) एका गुणाचीच कमाई करता आली होती. सध्या त्यांचे २७ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना १९ जानेवारी फातोर्डा येथे ईस्ट बंगालविरुद्ध होईल.

सामन्यानंतर ५६ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक म्हणाले, की ‘‘आम्ही लीग शिल्डसाठी झुंजत आहोत. त्या कारणास्तव आम्ही महत्त्वाकांक्षी आहोत. सध्या आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत ही वस्तुस्थिती आहे. मोहन बागान सुपर जायंटची स्थिती चांगली असल्याचे जाणवते. काय होईल ते पाहुया. आम्ही लढत राहू. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात दुसऱ्या संघाने पुन्हा एकदा गोल केला हे क्लेशदायी आहे, तरीही मला वाटते की निकाल योग्य आहे.’’

‘‘सातत्य राखल्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेड (NorthEast United) संघ खूपच खडतर आहे. त्यांना काय साधायचे आहे याची स्पष्ट जाणीव आहे. त्यांच्या खेळाडूंमुळे भीतीची भावना कायम असते आणि त्यामुळे त्यांना रोखणे कठीण ठरते,’’ असे मतही मार्केझ यांनी प्रतिस्पर्धी संघाविषयी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT