Manolo MArquez|FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: ..आम्ही नक्कीच उसळी घेऊ शकतो! बंगालविरुद्धच्या सामन्यापूर्वी FC Goa चे प्रशिक्षक मार्केझ यांचा विश्वास

FC Goa: जमशेदपूरविरुद्ध पराभव आणि कोलकत्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध भरपाई वेळेतील गोलमुळे बरोबरी यामुळे एफसी गोवाच्या खाती एक गुण आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League 2024-25

पणजी: एफसी गोवा संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या चांगला खेळत नसला, तरी उसळी घेऊ शकतो. सांघिक भावनेने चांगले खेळणे आवश्यक आहे, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एफसी गोवा संघ यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील तिसरा सामना शुक्रवारी (ता. २७) कोलकता येथे ईस्ट बंगालविरुद्ध खेळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्केझ पत्रकार परिषदेत बोलत होते. अगोदरच्या लढतीत फातोर्डा येथे जमशेदपूरविरुद्ध पराभव आणि कोलकत्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध भरपाई वेळेतील गोलमुळे बरोबरी यामुळे एफसी गोवाच्या खाती एक गुण आहे.

मार्केझ म्हणाले, की ‘‘आम्ही संघ या नात्याने खेळताना दिसत नाही, तरी उसळी घेऊ शकतो. आम्हाला सांघिक पातळीवर मजबूत बनणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवरही खेळावर परिणाम होत आहे. आम्ही भरपूर चुका करत असून खेळाडू, राखीव फळी, प्रशिक्षक सारेजण त्यास जबाबदार आहेत. आम्हाला चांगल्या मानसिकतेेसह परिस्थिती बदलावीच लागेल.’’ मोहम्मेडनविरुद्ध संघाने अखेरच्या टप्प्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला ही निश्चितच चांगली बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

आयएसएल (ISL 2024) स्पर्धेत गतमोसमातील दोन आणि यंदा दोन मिळून एकूण चार सामने एफसी गोवा संघ विजयाविना आहे. याविषयी ५६ वर्षीय मार्केझ म्हणाले, की ‘‘चार सामने विजयाविना हा मोठा कालावधी नाही. एफसी गोवासाठी सर्वोत्तम अकरा सदस्यीय चमू अजूनही गवसलेला नाही. संघात अधिक प्रमाणात समतोलता गरजेची आहे. प्रशिक्षक या नात्याने हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे.’’

पेनल्टी निर्णयांवर नाराजी

मागील दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी एफसी गोवाविरुद्ध पेनल्टी गोल नोंदविले. दोन्ही वेळेस संघातील मुख्य खेळाडू ओडेई ओनाइंडिया याला यलो कार्ड मिळाले. यासंदर्भात मार्केझ यांनी दोन्ही सामन्यांतील पेनल्टी फटक्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

संघात सुधारणेस भरपूर वाव; आकाश संगवान

एफसी गोवाच्या पत्रकार परिषदेस संघाने यंदा करारबद्ध केलेला बचावपटू आकाश संगवानही उपस्थित होता. त्याने संघाच्या कामगिरीविषयी सांगितले, की ‘‘आम्हाला कामगिरी निश्चितच उंचवावी लागणार असून सुधारणेस भरपूर वाव आहे. ही वेळ एकमेकांना दोष देण्याची निश्चितच नाही. क्षमतेनुसार खेळण्यावर सध्या लक्ष केंद्रीत आहे.’’

गतमोसमात चेन्नईयीन एफसीकडून खेळल्यानंतर यंदा एफसी गोवाशी करारबद्ध होण्याविषयी आकाशने सांगितले, की ‘‘विजेतेपद पटकावण्याचे ध्येय बाळगून मी एफसी गोवा संघात दाखल झालो आहे. मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरीत सुधारणा आणि प्रगती साधण्याकडे माझा कल आहे.’’ आकाश जमशेदपूरविरुद्ध पहिल्या सामन्यात पहिल्या अकरा सदस्यीय संघात होता, तर किंचित दुखापतीमुळे मोहम्मेडनविरुद्ध तो उत्तरार्धात बदली खेळाडू या नात्याने खेळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT