ISL 2024-25: एफसी गोवाच्या निष्प्रभ आणि खराब खेळाची मालिका कायम! सादिकूच्या गोलमुळे सामना बरोबरीत

FC Goa: एफसी गोवाचा स्पर्धेतील तिसरा सामना २७ सप्टेंबर रोजी कोलकाता येथेच ईस्ट बंगालविरुद्ध होईल
FC Goa: एफसी गोवाचा स्पर्धेतील तिसरा सामना २७ सप्टेंबर रोजी कोलकाता येथेच ईस्ट बंगालविरुद्ध होईल
FC Goa VS Mohammedan SCDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League 2024-25

पणजी: भरपाई वेळेतील चौथ्या मिनिटास आर्मांदो सादिकू याने केलेल्या गोलमुळे पीछाडीवरून मोहम्मेडन स्पोर्टिंगला १-१ असे गोलबरोबरीत रोखणे एफसी गोवा संघाला शक्य झाले आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अकराव्या मोसमातील पहिला गुण प्राप्त झाला.

कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर शनिवारी सामना झाला. बरोबरी नोंदविली असली तरीही एफसी गोवाच्या निष्प्रभ आणि खराब खेळाची मालिका कायम राहिली. पहिलाच मोसम खेळणाऱ्या मोहम्मेडन स्पोर्टिंगसमोर ते बहुतांश वेळ हतबल ठरले.

एफसी गोवाचा स्पर्धेतील तिसरा सामना २७ सप्टेंबर रोजी कोलकाता येथेच ईस्ट बंगालविरुद्ध होईल.ॲलेक्सिस गोमेझ याने ६६व्या मिनिटास केलेल्या पेनल्टी गोलमुळे मोहम्मेडन स्पोर्टिंगला आघाडी मिळाली. ९०+४व्या मिनिटास आकाश संगवान याच्या क्रॉसपासवर सादिकूचे अगदी जवळून हेडिंग भेदक ठरल्याने एफसी गोवा संघ पराभवातून बचावला. सादिकूचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. पेनल्टी फटक्यावरील गोल वगळता एफसी गोवाचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी दक्ष राहिल्यामुळे मोहम्मेडन स्पोर्टिंगचे प्रयत्न सत्कारणी लागले नाहीत.

ओडेईची पुन्हा चूक, मोहम्मेडनला आघाडी

उत्तरार्धाच्या सुरवातीसच प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना एफसी गोवा संघात तीन बदल करावे लागले. एफसी गोवाचा स्पॅनिश बचावपटू ओडेई ओनाइंडिया याने सलग दुसऱ्या सामन्यात चूक केली व मोहम्मेडन स्पोर्टिंगला पेनल्टी फटका मिळाला. ॲलेक्सिस गोमेझ याने गोलरक्षक कट्टीमणीचा अंदाज चुकवत यजमान संघाला ६६व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. यलो कार्ड मिळालेल्या ओडेई याला बदलून मानोलो यांनी कार्ल मॅकह्यू याला संधी दिली.

FC Goa: एफसी गोवाचा स्पर्धेतील तिसरा सामना २७ सप्टेंबर रोजी कोलकाता येथेच ईस्ट बंगालविरुद्ध होईल
ISL 2024-25: आजच्या सामन्यात एफसी गोवाला ऐतिहासिक विक्रमाची संधी! ठरणार पहिलाच संघ

जमशेदपूरचा विजयी धडाका कायम

१) आयएसएल स्पर्धेत शनिवारी झालेल्या आणखी एका सामन्यात जमशेदपूर एफसीने हावी हर्नांडेझच्या दोन गोलमुळे विजयी धडाका कायम राखताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी गतवेळच्या करंडक विजेत्या मुंबई सिटी एफसीला पीछाडीवरून ३-२ असे पराजीत केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी फातोर्डा येथील एफसी गोवालाही नमविले होते.

२) जमशेदपूरचे आता दोन लढतीतून सहा गुण झाले आहेत, तर तेवढ्याच लढतीतून मुंबई सिटीचा एक गुण कायम राहिला. जमशेदपूरसाठी जॉर्डन मरे याने ३६व्या मिनिटास गोल केला, नंतर हावी हर्नांडेझ याने अनुक्रमे ४४व्या मिनिटास थेट फ्रीकिकवर, तसेच ५०व्या मिनिटास प्रत्येकी एक असे एकूण दोन गोल केले. मुंबई सिटीसाठी निकोलास कॅरेलिस याने १८व्या, तर योएल व्हॅन निएफ याने ७७व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com