FC Goa coach Manolo Marquez on Nemil Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

FC Goa coach Manolo Marquez on Nemil: नवोदित २३ वर्षीय मुहम्मद नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: संक्षिप्त स्वरुपातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळताना एफसी गोवाने नवे परदेशी खेळाडू करारबद्ध केलेले नाहीत, या पार्श्वभूमीवर संघातील नवोदित २३ वर्षीय मुहम्मद नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा आली असून मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझही केरळमधील कोझिकोड येथे जन्मलेल्या प्रतिभाशाली आघाडीपटूवर खूश आहेत.

मार्केझ यांनी स्पर्धेतील पहिल्या लढतीत फातोर्डा येथे इंटर काशीविरुद्धच्या लढतीत नेमिल याला प्रथमच ‘स्टार्टिंग लिस्ट’मध्ये स्थान दिले, आता २० फेब्रुवारीस कोलकाता येथे होणाऱ्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबविरुद्धच्या लढतीतही नेमिलच आक्रमणात मुख्य अस्त्र राहण्याचे संकेत मार्केझ यांनी बुधवारी दिले.

दुखापतीमुळे नेमिलच्या कारकिर्दीत चढउतार आले, पण प्रशिक्षणात सतत मेहनत घेतो. संघात परदेशी खेळाडू असतानाही आम्ही त्याच्या समावेशाबाबत विचार केला होता. संघाच्या मैत्रिपूर्ण लढतीत त्याने सातत्य प्रदर्शित करताना नऊ गोल केले आहेत. तो एक दर्जेदार आघाडीपटू संघाचा त्याच्यावर विश्वास आहे. याअगोदरच्या लढतीत बदली खेळाडू या नात्याने खेळताना त्याने छाप पाडली होती, असे स्पॅनिश प्रशिक्षकाने कोलकात्यास रवाना होण्यापूर्वी सांगितले.

आयएसएल स्पर्धेत नेमिलने यापूर्वी एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केलेले आहे, पण तो बदली खेळाडू या नात्याने खेळलेला आहे. आता प्रथमच ‘स्टार्टिंग लिस्ट’मध्ये स्थान मिळाल्यामुळे तो खूष असून प्रशिक्षकास त्याने श्रेय दिले. ‘‘स्टार्टिंग लिस्टमध्ये समावेश झाल्यानंतर माझ्यावर अजिबात दबाव नव्हता. माझी नेमकी काय भूमिका आहे हे प्रशिक्षकाने समजावून सांगितले होते. मी बिनधास्तपणे खेळलो,’’ असे मागील सामन्याविषयी नेमिल म्हणाला. ‘‘आता बाकी सामन्यांत संधी साधताना अधिकाधिक गोल करण्याचे ध्येय मी बाळगले आहे,’’ असे तो म्हणाला. निश्चितच संधी मिळेल हे जाणून होतो. त्यामुळे प्रतीक्षेत होतो, असेही नेमिल याने नमूद केले.

फातोर्डा येथे एफसी गोवा व इंटर काशी यांच्यातील सामना १-१ गोलबरोबरीत राहिला होता. मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध त्यांचा ल दुसरा सामना आहे. मोहम्मेडनला जमशेदपूरकडून पराभव पत्करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT