Indian Super League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

FC Goa Coach Gouramangi Singh: एफसी गोवा संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दोन्ही लढतीत गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: एफसी गोवा संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील दोन्ही लढतीत गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग सावध असून पुढील लढतीत संघ चांगली कामगिरी बजावण्याबाबत आशावादी आहेत.

एफसी गोवाचा स्पर्धेतील तिसरा सामना रविवारी (ता. १) पुणे येथे इंटर काशी संघाविरुद्ध होणार आहे. या लढतीसाठी रवाना होण्यापूर्वी गौरमांगी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत संवाद साधता. एफसी गोवाचे सध्या दोन लढतीतून दोन गुण असून इंटर काशी संघाच्या खाती दोन पराभव व एका बरोबरीमुळे फक्त एक गुण आहे.

आयएसएल स्पर्धेत इंटर काशी संघाला कमजोर मानले जाते. या अनुषंगाने गौरमांगी यांनी सांगितले, की दोन बरोबरीनंतर आम्हाला संधींचा लाभ उठवत विजयाच्या पूर्ण तीन गुणांची कमाई करावीच लागेल. आमची आक्रमणे जास्त निर्णायक ठरणे आवश्यक आहे.

एफसी गोवाचा युवा गोलरक्षक बॉब जॅकसन राज याने सांगितले, की ‘‘इतक्या लवकर एवढी मजल मारणार याची कल्पना नव्हती, पण योग्य वेळी संधी मिळणार हे जाणून होतो. गोलरक्षक या नात्याने आव्हान स्वीकारणे आवडते.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

Under 23 Cricket: पहिल्या डावात आघाडी, तरीही गोव्याचा पराभव; ओडिशाने 125 धावांनी दिला धक्का

Goa Horticulture Development: गोव्यात आंबा, नारळ, काजू अन् बांबूसाठी स्वतंत्र मंडळे! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा नवा आराखडा

VIDEO: जरा तरी लाज बाळगा! पाकिस्तानी क्रिकेटपटूला विचारलं 'Who Are You?' तर म्हणाला, 'I Am Fine'; व्हिडीओ व्हायरल

Ferry Service Problems: दोन जुन्या फेरीबोटी, हजारो प्रवासी अन् अनिश्चित सेवा; सारमानस-टोंक मार्गावर नवी बोट कधी?

SCROLL FOR NEXT