FC Goa Beat Sporting Club Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Tournament: एफसी गोवानं स्पोर्टिंग क्लबची उडवली दाणादाण! धेंपोचं मैदान मारतं साधली विजयी 'हॅटट्रिक'

FC Goa Beat Sporting Club: एफसी गोवा संघाने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत सलग विजयाची हॅटट्रिक साधताना शुक्रवारी धेंपो स्पोर्टस क्लबचा कडवा प्रतिकार परतावून लावला.

गोमन्तक डिजिटल टीम

एफसी गोवा संघाने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत सलग विजयाची हॅटट्रिक साधताना शुक्रवारी धेंपो स्पोर्टस क्लबचा कडवा प्रतिकार परतावून लावला. त्यांचे अ गटात ओळीने तीन विजयांसह सर्वाधिक नऊ गुण झाले. सामना एला-जुने गोवे येथील धेंपो अकादमी मैदानावर झाला.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ऑस्ट्रेलियातील ए-लीग संघ ब्रिस्बेन रोअर एफसीने स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला २-० असे नमवून एफसी गोवासह अ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तीन लढतीतील दोन विजयांमुळे त्यांचे सहा गुण झाले व गटात दुसरा क्रमांक मिळाला. धेंपो क्लबचे तीन लढतीतून दोन पराभव व एका विजयासह तीन गुण झाले, तर स्पोर्टिंग क्लब द गोवास तिन्ही सामन्यांत पराभूत व्हावे लागले. या दोन्ही संघांचे आव्हान साखळी फेरीतच आटोपले.

एला-जुने गोवे येथे झालेल्या लढतीत अल्बानियाच्या ३३ वर्षीय आर्मांदो सादिकू याने एफसी गोवास १६व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. सादिकू याचा हा स्पर्धेतील सलग तिसरा गोल ठरला. नंतर ५८व्या मिनिटास शुभम रावत याने धेंपो क्लबला बरोबरी साधून दिली. मात्र लगेच ६२व्या मिनिटास आयुष छेत्रीच्या गोलमुळे एफसी गोवाने आघाडी घेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. सहकारी देयान द्राझिच याच्या फटक्यावर आयुषने चेंडूला अचूक दिशा दाखविली. फातोर्डा येथे लुईस झाबाला व हॅरी व्हॅन देर साग यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे ब्रिस्बेन रोअरने स्पोर्टिंग क्लब द गोवास हरविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT